शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

परदेशी शिष्यवृत्तीसाठी ८ लाख उत्पन्नाची मर्यादा जिव्हारी

By निशांत वानखेडे | Updated: May 9, 2024 13:07 IST

पूर्वी पहिल्या १०० विद्यापीठांसाठी नव्हता निकष : मागासवर्गीयांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेबाबत राज्य सरकारच्या नवे परिपत्रक वादाच्या भोवऱ्यात आहे. समान धोरण लागू करण्याच्या नावाखाली अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के गुणांची अट लावल्यानंतर आता ८ लाख उत्पन्न मर्यादा असलेल्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल, या अटीवर आक्षेप घेतला जात आहे. या अटीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारच्या छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी अनुसूचित जातीचे ७५ विद्यार्थी परदेशी विद्यापीठात प्रवेश घेतात. अशाच प्रकारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीही परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे. सामाजिक न्याय विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (तार्टी) मार्फत योजना राबविली जाते. मात्र राज्य सरकारच्या ९ नोव्हेंबर २०२३ च्या शुद्धिपत्रकानुसार यापुढे बार्टी, तार्टी, महाज्योती, सारथी व अमृत या संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'सारथी' या संस्थेचे निकष ग्राह्य धरले जाणार आहेत.

त्यानुसार परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ७५ टक्के गुणांच्या अटीसह ८ लाखांच्या उत्पन्नाची मर्यादा ग्राह्य धरली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे परदेशी शिष्यवृत्ती योजनेबाबत अद्याप सूचना निघाली नाही. त्यात हे निकष लागू करण्यात आले तर न्यायालयात जाण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

साधारण कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन ८ लाखांवर...यापूर्वी अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी जगातील टॉप १०० विद्यापीठांत प्रवेशास पात्र ठरले तर उत्पन्नाचे निकष लागू नव्हते. मात्र यापुढे त्यांनाही उत्पन्नाची अट लागू राहणार आहे. या धोरणामुळे अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थी-पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शासकीय सेवेतील साधारण कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन ८ लाख रुपयांच्या वर जाते. मात्र मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याची त्यांची कुवत नसते. त्यामुळे सरकारी मदतीने परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे.

समान धोरण तत्त्वाचे निकस हे बार्टी, सारथी, तार्टी, महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या योजनांसाठी आहेत. अनुसूचित जाति-जमातीची विदेश शिष्यवृत्ती योजनाही या स्वायत्त संस्थांमध्ये येत नाहीत. ती सामाजिक न्याय विभागाची स्वतंत्र योजना आहे. त्यामुळे समान धोरण तत्त्वाचे निकस या योजनेला लागू करता येत नाही. तसेच संविधानात या दोन वर्गासाठी विशेष प्रावधान आहेत. त्यामुळे इतर प्रवर्गाच्या योजनांच्या तुलनात्मक निकष लावणे हा राज्य सरकारचा निर्णय असंवैधानिक आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे ८ लाखाची उत्पन्न मर्यादा काढून ही योजनापूर्ववत करावी, अन्यथा याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ. - अतुल खोब्रागडे, युवा ग्रॅज्युएट फोरम

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीnagpurनागपूर