शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ७८३३ मालमत्ताधारकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:16 IST

महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी आता ५० दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने विभागाने थकबाकी वसुलीसाठी कं बर कसली आहे. ७८३३ थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर ८७ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची तयारी केली आहे.

ठळक मुद्देथकबाकीमुळे मालमत्ता विभागाची कारवाईटॅक्स न भरल्यास हुकूमनामा काढून लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी आता ५० दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने विभागाने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे. ७८३३ थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर ८७ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची तयारी केली आहे.शहरातील ५ लाख ३६ हजार मालमत्तांपैकी ४ लाख ५३ हजार डिमांड तयार करण्यात आल्या. यातील ३ लाख ३५ हजार डिमांड वाटप करण्यात आल्या. थकबाकी वसुलीसाठी सुरुवातीला नोटीस व वॉरंट बजावल्यानंतर ठराविक मुदतीत थकबाकी न भल्यास अशा थकबाकीदारांच्याविरोधात हुकूमनामा काढून चल व अचल संपत्तीचा जाहीर लिलाव क रण्याची प्रक्रिया केली जात आहे. मागील काही वर्षापासून मालमत्ता कर थकीत असलेल्या ७८३३ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.नोटीस बजावताना चल-अचल संपत्ती जप्त करण्याची कायद्यात तरतूद आहे. परंतु झोन स्तरावर अशा प्रकारची कारवाई होत नव्हती. त्यामुळे नोटीस बजावल्यानंतरही मालमत्ताधारकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु यावेळी नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. २०१८-१९ या वर्षात मालमत्ता कराचे ५०९ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ७ जानेवारी पर्यंत १६५ कोटींची वसुली झाली आहे. उर्वरित वसुली ५० दिवसांत करावयाची आहे. याचा विचार करता मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे.८७ मालमत्ता मनपाच्या नावावर करणारथकबाकी न भरल्याने तीनदा लिलाव केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळालेल्या ८७ मालमत्ता आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया मालमत्ता विभागाने सुरू केली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. यात हनुमाननगर झोनमधील ५५, सतरंजीपुरा २३, धंतोली झोनमधील ५, मंगळवारी ३ व धरमपेठ झोनमधील एका मालमत्तेचा समावेश आहे.शासकीय कार्यालयाकडे १०० कोटीशहरातील ४५ मालमत्ताधारकांकडे जवळपास १५० कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता विभागाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. यात काही मॉलचाही समावेश आहे. अशा थकबाकीदारांना नोटीस बजावून हुकूमनामा काढून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील मोठ्या मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे. तसेच थकबाकीदारात शासकीय कार्यालयांचाही समावेश असून त्यांच्याकडे जवळपास १०० कोटींची थकबाकी  आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर