शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

७७ कोटीची उच्चस्तरीय चौकशी करा : विरोधकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:18 IST

जिल्हा परिषदेचा ठेवी रूपात जमा केलेला ७७ कोटीचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकला आहे. हा निधी परत आणण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने कुठलेही प्रयत्न केले नाही. जिल्हा परिषदेचा निधी असल्यामुळे तो बँकेकडून वसूल करावा, तसेच या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकला निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचा ठेवी रूपात जमा केलेला ७७ कोटीचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकला आहे. हा निधी परत आणण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने कुठलेही प्रयत्न केले नाही. जिल्हा परिषदेचा निधी असल्यामुळे तो बँकेकडून वसूल करावा, तसेच या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत केली.जिल्हा परिषदेच्या हक्काचा ७७ कोटीचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेव स्वरूपात जमा होता. २०१४ पूर्वीचा हा निधी आहे. शासनाने विकास कामांसाठी हा निधी जिल्हा परिषदेला विविध शीर्षांअंतर्गत दिला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व ठेवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होत्या. त्यावर मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला व्याजही मिळायचे. ही बँक अवसायनात निघाली. त्यानंतर तत्कालीन राज्य शासनाने निधी देऊन बँकेचे व्यवहार पूर्ववत केले. ग्रामीण भागातील विकासासाठी जि. प. सदस्य विकास कामांच्या निधीसाठी गयावया करीत असताना निधी नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे इतका मोठा निधी बुडीत खात्यात जमा आहे. हा निधी मिळाल्यास ग्रामीण भागात विकास कामे करण्यास मदत मिळेल. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, बँकेकडून जि.प.ला हा निधी परत मिळण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. पत्रपरिषदेला जि.प.सदस्य कैलास बरबटे, मोहन माकडे, राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर आदी उपस्थित होते.तातडीने घ्या सर्वसाधरण सभाजि.प.ची निवडणूक होऊन ६ महिन्याचा कालावधी लोटला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्याने बजेटसुद्धा घेता आले नाही. सर्वसाधारण सभा न झाल्याने विविध कामांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील योजना रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तातडीने घेण्याची मागणीसुद्धा करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरMediaमाध्यमे