शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

७५० ग्राम सोने चोरीचे प्रकरण : तब्बल पाच वर्षानंतर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:57 IST

पंजाबमधील सराफा व्यापाऱ्याचे ७५० ग्राम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देएकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाबमधील सराफा व्यापाऱ्याचे ७५० ग्राम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल केला. अमृतसर (पंजाब) च्या कस्टम कॉलनीत राहणारे सराफा व्यावसायिक रमण रोशनलाल कक्कड (वय ५९) आणि त्यांचा लहान भाऊ सुरेश कक्कड १२ जुलै २०१४ ला अमृतसरहून नागपूरला आले होते. त्यांनी १ किलो, ९०० ग्राम सोन्याचे दागिने येथे आणले होते. लकडगंज, इतवारीतील रेशीम ओळीत असलेल्या जैन धर्मशाळेत ते मुक्कामी थांबले होते. १२ ते १८ जुलै २०१४ च्या कालावधीत त्यांनी यातील १ किलो १५० ग्राम दागिन्यांची शहरातील व्यावसायिकांना विक्री केली तर, २० लाख, ५२ हजार रुपये किंमतीचे ७५० ग्राम दागिने त्यांनी एका ब्रिफकेसमध्ये ठेवून ती धर्मशाळेत घेतलेल्या रूममधील कपाटात ठेवली होती. त्यानंतर रमण कक्कड गोंदियाला तर त्यांचे बंधू सुरेश मुंबईला निघून गेले. २२ जुलैला परत आले तेव्हा त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी रोहित बळीराम बोकडे (वय २७,. लालगंज कुंभारपुरा, शांतिनगर), तानाजी मोरे सह अन्य काही जणांविरुद्ध २२ जुलैला लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे टाळल्याने २३ जुलैला कक्कड ठाण्यात आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने कारवाई करत नसाल तर राहू द्या, असे नाराजीने म्हटले. पोलिसांनी त्यांना तसे लिहून देण्यास सांगितले असता कक्कड यांनी एफआयआर दाखल करायचा नाही, असे पोलिसांकडे २३ जुलैला लिहून दिले. त्यानंतर वरिष्ठांकडे या प्रकरणाची तसेच लकडगंज पोलिसांची तक्रार पाठवली. उच्च न्यायालयातही रिट पीटिशन दाखल केली. या संबंधाने कोर्टाने दिलेल्या आदेशावरून पोलिसांनी अमृतसरच्या कक्कड यांना नागपुरात बोलवून घेतले आणि त्यांची नव्याने तक्रार नोंदवून घेत शुक्रवारी गुन्हा दाखल केला.एकाला अटक, बाकी फरारहे प्रकरण पोलिसांच्या अंगावर शेकू शकते. ते ध्यानात आल्यामुळे लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल होण्याच्या काही तासातच आरोपी बोकडेला अटक केली. त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी