शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये ७४ ट्रान्सफॉर्मर फेल; कधीही होऊ शकते बत्ती गुल, महावितरणचा दावा मात्र फोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:25 IST

Nagpur : बेसा ते रिंग रोड; ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज उडाला !

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उकाड्याने नागपूरकर त्रस्त झाले असून, खंडित वीजपुरवठ्याने त्यात भर घातली आहे. रात्री कधी बत्ती गुल होईल. हे सांगता येत नाही. त्यामुळे एसी, कूलर आणि पंखे बंद पडतात व उकाड्याने नागरिकांना घामाघूम व्हावे लागते. त्यात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.

वीज व्यवस्थेतील वितरण तांत्रिक त्रुटीमुळे ट्रान्सफॉर्मर सतत बंद पडत असल्याची माहिती आहे. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत ७४ ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. दुसरीकडे महावितरणचा दावा आहे की ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याचे प्रमाण १.७ टक्के आहे. हे इतर विभागांपेक्षा कमी आहे. पण, प्रत्यक्षात ७४ ट्रान्सफॉर्मर बंद पडणे होणे ही गंभीर बाब आहे. 

ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्मर योग्य दाबाने वीज पुरवठा करू शकत नाहीत. नुकतेच नारी-नारा परिसरात कमी दाबामुळे नागरिक आक्रमक झाले आणि रात्री महावितरणच्या कार्यालयात धडकले. ट्रिपिंगचं मुख्य कारण ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरच असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील बहुतांश ट्रान्सफॉर्मर सध्या ८० टक्क्यांहून अधिक क्षमतेवर चालत आहेत. त्यामुळे मागणी वाढल्यास ते कधीही बंद पडण्याची शक्यता आहे. मात्र, महावितरणच्या म्हणण्यानुसार, ही समस्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. प्रत्येक विभागामध्ये दोन एजन्सी तैनात असून, ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यास तत्काळ बदलण्यात येत आहेत. ट्रान्सफॉर्मरचीही कमतरता नाही.

लोड बॅलन्स करत नाहीत लाइनमनप्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर समान लोड असणे आवश्यक असते. हा लोड बॅलन्स करण्याची जबाबदारी लाइनमनवर असते. मात्र, बहुतांश लाइनमन आपले काम नीट करत नाहीत. त्यामुळे काही ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत, तर काहींवर किमान भारही नाही. यामुळेच वीज जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

विकसित होत असलेल्या भागांत अधिक त्रासबेसा, गोरेवाडा, हुडकेश्वर आणि रिंग रोड परिसरात ट्रान्सफॉर्मरवर जास्त ओव्हरलोड आहे. शहराच्या दाट वस्तीत मात्र ट्रान्सफॉर्मर चांगले कार्यरत आहेत. स्पेशल प्रोजेक्ट अंतर्गत या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले गेले आहेत. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज