शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाची सुरुवात! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ७.३४ लाख पालकांनी उघडले 'सुकन्या समृद्धी' योजनेसाठी खाते ! काय आहे ही योजना आणि प्रक्रिया ?

By दयानंद पाईकराव | Updated: April 13, 2026 13:27 IST

Nagpur : वडिलांसाठी लेक म्हणजे काळजाचा तुकडा अन् आयुष्याची खरी पुंजी. तिच्या बोबड्या बोलांनी घराचे नंदनवन होते, पण तिची पावले मोठी होऊ लागली की, वडिलांच्या मनात तिच्या भविष्याच्या चिंतेचा काहूर माजतो.

दयानंद पाईकराव लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलांसाठी लेक म्हणजे काळजाचा तुकडा अन् आयुष्याची खरी पुंजी. तिच्या बोबड्या बोलांनी घराचे नंदनवन होते, पण तिची पावले मोठी होऊ लागली की, वडिलांच्या मनात तिच्या भविष्याच्या चिंतेचा काहूर माजतो. आपल्या 'राजकन्ये'च्या स्वप्नांना कधी पैशांची कमतरता भासू नये, यासाठी मागील ११ वर्षात विदर्भातील ७.३४ लाख पित्यांनी 'सुकन्या समृद्धी' योजनेतून लेकीच्या भविष्याची सुरक्षित तटबंदी उभारली आहे.

मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या या मोहिमेत नागपूर जिल्ह्याने विदर्भात अव्वलस्थान पटकावले आहे, तर अमरावती जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही योजना केवळ आर्थिक बचत नाही, तर मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल ठरत आहे.

काय आहे ही योजना आणि प्रक्रिया ?

  • सुकन्या समृद्धी योजनेची रचना पालकांसाठी अतिशय सुलभ ठेवण्यात आली आहे. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुलीच्या जन्माचा दाखला, पालकांचे ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा सादर केल्यास हे खाते उघडता येते.
  • विशेष म्हणजे, वर्षाला किमान २५० रुपयांपासून ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सोय यात आहे. ही गुंतवणूक १५ वर्षापर्यंत करायची असून, त्यावर सध्या ८.२ टक्के असा अत्यंत आकर्षक व्याजदर दिला जात आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश मुलीच्या उच्चशिक्षणाची सोय करणे हा आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा तिने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, तिच्या पुढील शिक्षणासाठी खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची मुभा मिळते. तसेच, २१ वर्षांनंतर हे खाते पूर्णतः बंद होऊन व्याजासह एक मोठी रक्कम पालकांच्या हाती येते, जी लग्नासाठी किंवा उच्च करिअरसाठी वरदान ठरते.

 

जिल्हा - उघडलेली एकूण खातीनागपूर - १,४३,६५०अमरावती - १,१४,०४५वाशिम व अकोला - १,१७,३७६गडचिरोली व चंद्रपूर - ८६,५११गोंदिया व भंडारा - ८१,११५बुलढाणा - ७५,४३७यवतमाळ - ७५,४३४वर्धा - ४०,३४३एकूण विदर्भ - ७,३३,९११

"सरपंच, पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रत्येक मुलीचे या योजनेत खाते उघडून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित गावही सुकन्या समृद्ध गाव म्हणून ओळखले जाईल."

- डॉ. सुधीर जाखेरे, संचालक, डाक सेवा विदर्भ विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha parents invest in Sukanya Samriddhi Yojana for daughters' secure future.

Web Summary : Over 7.34 lakh Vidarbha parents invested in Sukanya Samriddhi Yojana, securing daughters' futures. Nagpur leads, offering 8.2% interest on investments up to ₹1.5 lakh annually, promoting education and marriage.
टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भnagpurनागपूर