शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

९४४३ चाचण्यांतून ७२५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:13 IST

नागपूर : मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने प्रशासनाने आज शनिवार सुटीचा दिवस असतानाही नमुने तपासणीचा उच्चांक ...

नागपूर : मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने प्रशासनाने आज शनिवार सुटीचा दिवस असतानाही नमुने तपासणीचा उच्चांक गाठला. पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच ९४४३ चाचण्या झाल्या. यात ७२५ बाधितांची नोंद झाली. पॉझिटिव्हीटीचे हे प्रमाण ७.६७ टक्क्यांवर गेले. रुग्णांची एकूण संख्या १,४२,५०७ झाली असून ६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२६७ वर पोहोचली. विशेष म्हणजे आज ५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांनी उच्चांक गाठला होता. याच महिन्यात ९ हजारांवर चाचण्यांची संख्या गेली होती; परंतु त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारीत चाचण्यांची संख्या ६ हजारांपुढे सरकलीच नाही. मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य पथकाने नागपूर जिल्ह्याच्या घेतलेल्या आढाव्यात ‘ट्रेसिंग’ व ‘टेस्टिंग’बाबत अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. परिणामी, १६ फेब्रुवारीपासून चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. आज एकूण चाचण्यांमध्ये ६५९० आरटीपीसीआर व २५८३ रॅपिड अँटिजेन चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमध्ये ६८९, तर अँटिजेनमधून ३६ बाधित आढळून आले.

- शहरात ५८५, ग्रामीणमध्ये १३७ रुग्ण

शुक्रवारच्या तुलनेत आज रुग्ण व मृतांच्या संख्येत घट आली. नव्या रुग्णांमध्ये शहरातील ५८५, ग्रामीणमधील १३७, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आज ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली. शहरात व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी ३ रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,१३,६७७ व २७६३ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये २७,९०७ रुग्ण व ७६३ मृत्यू झाले आहेत.

-खासगीमध्ये सर्वाधिक तपासले नमुने

सहा शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत आज कोरोनाचे सर्वाधिक ३९३६ नमुने खासगी लॅबमध्ये तपासण्यात आले. यात २३८ बाधितांची नोंद झाली. मेयोच्या प्रयोगशाळेत ११४८ नमुन्यांतून १४४, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ५५१ नमुन्यांतून १३९, एम्सच्या प्रयोगशाळेत ४४५ नमुन्यांतून ९१, नीरीच्या प्रयोगशाळेत २१२ नमुन्यांतून ४२, तर नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २९८ नमुन्यांतून ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

-सात दिवसांतील पॉझिटिव्हीटीचा दर

तारीखरुग्ण

१४ फेब्रुवारी ४५५ ३३३७ १३.६३ टक्के

१५ फेब्रुवारी ४९८ २६३५ १८.८९ टक्के

१६ फेब्रुवारी ५३५ ५३८३ ९.९३ टक्के

१७ फेब्रुवारी ५९६ ७५६७ ७.८७ टक्के

१८ फेब्रुवारी ६४४ ६७७५ ९.५० टक्के

१९ फेब्रुवारी ७५४ ६०८६ १२.३८ टक्के

२० फेब्रुवारी ७२५ ९४४३ ७.६७ टक्के