शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वीज कर्मचारी करणार ७२ तासांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:38 IST

राज्यातील तिन्ही वीज कंपन्या महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांनी येत्या ७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सब-आर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आणि वीज कामगार युनियन यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जा विभाग आणि व्यवस्थापनाला नोटीस दिली आहे. इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टमध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध व कर्मचाऱ्यांंच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरकारला नोटीस : कायद्यात संशोधनाचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील तिन्ही वीज कंपन्या महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांनी येत्या ७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सब-आर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आणि वीज कामगार युनियन यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, ऊर्जा विभाग आणि व्यवस्थापनाला नोटीस दिली आहे. इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टमध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध व कर्मचाऱ्यांंच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा इशारा देण्यात आला आहे.वर्कर्स फेडरेशनद्वारा जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तीन कंपन्यांचे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून सरकारसोबत आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करीत आहेत. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कामगार संघटनांनी ६ व ७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपासून एक दिवसाच्या संपाची घोषणा केली होती. त्यात आता ८ आणि ९ तारखेलाही जोडण्यात आले आहे. संघटनांच्या इतर मागण्यांमध्ये महावितरणची पुनर्रचनेबाबत त्यांनी दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी व्हावी, महापारेषणमध्ये मंजूर पद कमी करण्यात येऊ नयेत, फ्रेन्चाईसीवर रोख लावत मुंब्रा, शील, कळवा व मालेगाव येथे फ्रेन्चाईसीबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्यात यावी, महाजेनकोचे लघु जल विद्युत प्रकल्प अधिग्रहित न करणे आणि महाजेनकोचे २१० मेगावॅट क्षमतेचे युनीट बंद करण्यात येऊ नयेत या मागण्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :electricityवीजStrikeसंप