शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

Nagpur: घरून पळून जाणारी ७० हजार मुले-मुली रेल्वे स्थानकांवर सापडली, सहा वर्षांतील धक्कादायक वास्तव

By नरेश रहिले | Updated: July 18, 2024 19:54 IST

Nagpur News: रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत बजावण्यात आलेल्या या कामगिरीमुळे या मुलांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले आहे.

घरगुती भांडणं, पालकांचे रागावणे, अन्य मुला-मुलींचे चमकदमक युक्त जीवण, बाह्य जिवनातील ग्लॅमरस तसेच अल्पवयीन गटातील आकर्षण वजा प्रेमप्रकरण आदी कारणांवरून अल्पवयीन मुला-मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रमाण सारखे वाढत असल्याचे लक्षात आल्याने रेल्वे सुरक्षा दलाने २०१८ मध्ये -अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यासंबंधी एक योजना सुरू केली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते असे या मोहिमेला नाव देण्यात आले. त्यानुसार, आरपीएफच्या जवानांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा बालकल्याण समितीच्या मदतीने 'चाईल्ड हेल्पलाईन' सुरू करण्यात आली. त्यानंतर २०१८ ला पहिल्याच वर्षांत १७११२ अल्पवयीन मुला-मुलींना विविध रेल्वे स्थानकांवर आरपीएफने ताब्यात घेतले. दुसऱ्या वर्षी अर्थात २०१९ ला १५, ९३२ मुले-मुली, २०२० ला ५,०११ मुले-मुली, २०२१ ला ११, ९०७ , २०२२-२३ ला ११,७९४ आणि २०२४ ला ४,६०७ मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आरपीएफला यश आले. मानसिकतेचा अंदाज अन् समुपदेशनमुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येते. त्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचेही समुपदेशन करून या मुला-मुलींना पालकांना सोपविले जाते.

टॅग्स :nagpurनागपूर