शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 22:23 IST

कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत.

ठळक मुद्दे नामांकित शाळांत फी भरल्यानंतर ऑनलाईन शिक्षणस्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत.जिल्ह्यातील स्वयंअर्थसाहाय्यित काही नामांकित शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले आहेत. केजीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या शाळा ऑनलाईन धडे देत आहेत. परंतु या शाळांचा या मागचा उद्देश पालकांकडून फी वसूल करण्याचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थांनी फी भरली त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवघी १० ते १५ टक्के आहे. नागपूर शहरात काही पालक समिती निर्माण झाल्या आहेत. त्या माध्यमातून शाळांकडून आकारण्यात येत असलेल्या फी विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक पालक या समितीच्या समर्थनात असल्याने आणि कोरोनामुळे रोजगाराचे प्रश्न निर्माण झाल्याने पालकांनी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद आहे.दरम्यान सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ऑनलाईनबाबत उदासीनता आहे. सरकारी आकडेवारीनुसार शासनाने ऑनलाईन शिक्षणासंदर्भात काढलेल्या अ‍ॅपद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. परंतु ही संख्याही पाच टक्केच्या वर नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण बंदच असल्यासारखे आहे. शाळा सुरू झाल्यानंतरच येथील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.- ऑनलाईन क्लासेस ही शाळा आणि पालकांच्या मूक संमतीने कोरोनाच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्याचा एक अपयशी प्रयत्न आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी चा पहिला हप्ता भरला नाही. त्यांचे ऑनलाईन क्लासेस शाळांनी बंद केले आहेत.गिरीश पांडे, अध्यक्ष, जागरुक पालक समितीमुळात शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे. काही शाळा फी वसुलीसाठी ऑनलाईन शिक्षणावर जोर देत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी, सरकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर आहे. त्यामुळे शिक्षणाची सर्व समावेशकता राहिली नाही. याकडे शिक्षण विभागानेच लक्ष वेधले पाहिजे.योगेश पाथरे, राष्ट्रीय संयोजकराष्ट्रीय शिक्षक पालक संघटन

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण