शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:28 IST

३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले.

ठळक मुद्देमोजक्याच हॉटेलचे दार उघडले : कायदे शिथिल करावेत, ‘गेस्ट’ येण्यास वेळ लागणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले. राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा व पर्यटन बंद असल्याने आणि कार्यशाळा, चर्चासत्र व इतर कार्यक्रमाला परवानगी नसल्याने ग्राहक मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये येण्यासाठी आम्हाला पुन्हा काही दिवस वाट पहावी लागेल, असा सूर हॉटेल मालकांनी लोकमतशी बोलताना काढला.पहिल्या दिवशी काहीच ग्राहकांनी हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती आहे. पण ही संख्या फार थोडी आहे. कमी संख्येतील ग्राहकांमुळे हॉटेलचा खर्च निघणे कठीण आहे. पुढे शासनाने अन्य कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी दिल्यास ग्राहकांची संख्या वाढेल. आवश्यक कामांसाठी नागपुरात येणारे लोक हॉटेलमध्ये थांबतील. हॉटेल संचालक आणि मालकांना व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.हॉटेल सेंटर पॉईंटचे व्यवस्थापकीय संचालक जसबीरसिंग अरोरा म्हणाले, सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा आणि रेल्वे बंद असल्याने प्रवासी नागपुरात आवश्यक कामांसाठी येत आहेत. त्याचा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. हॉटेल सुरू झाली, पण उद्योग रुळावर येण्यास उशीर लागेल.हॉटेल प्राईडचे महाव्यवस्थापक सुजीत सिंग म्हणाले, लोकांमध्ये उत्साह आहे. अनेकांनी माहिती जाणून घेतली. ग्राहकांचा हळूहळू प्रतिसाद मिळेल. अनेकांना नियम आणि अटींची माहिती नाही. निवासी हॉटेल लोकांची गरज आहे. पहिल्याच दिवशी कॉर्पोरेट क्षेत्राकडून खोल्यांसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात आली.नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, हॉटेल सुरू झाले आणि लोक येतील, असे पहिल्या दिवशी होणार नाही. प्रतिसाद मिळण्यासाठी एक वा दोन आठवडे वाट पहावी लागेल. बॅन्क्वेट हॉलवर बंधने आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही. स्थानिकांच्या प्रतिसादासाठी रेस्टॉरंट सुरू करणे आवश्यक आहेत. हॉटेल्सचे ऑनलाईन पोर्टल आजपासून सुरू झाले आहे. हॉटेलचा खर्च फिक्स आहे. त्यामुळे व्यवसाय वाढला पाहिजे. शासनाने कायदे शिथिल करावेत.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर