आरोपीजवळून ७ मोबाईल, ११ हजार जप्तनागपूर : तामिळनाडू एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये संशयास्पदरीत्या फिरताना लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ ७ मोबाईल आणि ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.धनराज खेमाजी प्रजापती (४०) रा. फालना, जि. पाली (राजस्थान) हा आरोपी रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये संशयास्पद हालचाली करताना ड्युटीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना दिसला. त्याला चौकशीसाठी बाहेर काढून त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याचे जवळ ७ मोबाईल आणि ११ हजार ५०० रुपये रोख आढळले. त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई महेंद्र मानकर, अशोक हनवते, लक्ष्मीकांत गुजर, शिवानंद नागरे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
आरोपीजवळून ७ मोबाईल, ११ हजार जप्त
By admin | Updated: May 3, 2014 16:44 IST