शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

नशेत स्कॉर्पिओ चालविल्यामुळे ७ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:09 IST

नशा करून वाहन चालविणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता टेका नाका परिसरात घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

ठळक मुद्देएसआरपीएफ जवानाचे कृत्य : नियंत्रण सुटल्यामुळे घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नशा करून वाहन चालविणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता टेका नाका परिसरात घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत आरोपी एसआरपीएफ जवानही जखमी झाला आहे.आरोपी उमाकांत चहारे एसआरपीएफ मध्ये हवालदार आहे. तो सकाळी ११.३० वाजता स्कार्पिओ क्रमांक एम. एच. ४०, बी. जे. ५५७५ ने जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमाकांतने नशा केली होती. टेका नाका ते कपिलनगर दरम्यान रंगीला पंजाब हॉटेलसमोर उमाकांतचे स्कार्पिओवरून नियंत्रण सुटले. त्याने स्कुटीवर स्वार लक्की देविदास हिरकन (१८) आणि रवि मुरलीधर पेंदाम (२१) रा. म्हाडा क्वार्टर यांना धडक दिली. लक्कीच्या घरी बांधकाम सुरु असल्यामुळे तो रविसोबत सिमेंटचे पोते आणण्यासाठी जात होता. त्यानंतर उमाकांतने कैलाश मदनलाल उईके (४३) रा. मानवतानगर, टेका नाका यांना जखमी केले. घटनास्थळी गर्दी जमा झाली. स्कार्पिओला आपल्याकडे येताना पाहून नागरिक जीव मुठीत घेऊन पळाले. लक्की, रवि आणि कैलाश यांच्यासह सात-आठ जणांना जखमी केल्यानंतर स्कार्पिओ उलटली. यामुळे उमाकांतही जखमी झाला. स्कार्पिओ उलटल्यामुळे नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना सूचना देऊन जखमींना रुग्णालयात पाठविले. नागरिकांनी उमाकांतला घेराव घातला. दरम्यान जरीपटकाचे सहायक उपनिरीक्षक संजय ढवळे, हवालदार कमलाकर तुनकिलवार सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. उमाकांतला नशेच्या अवस्थेत पाहून नागरिकांनी त्याला धडा शिकविण्याची मागणी केली. पोलिसांनी नागरिकांना शांत केले. त्यांनी उमाकांतला मेयो रुग्णालयात रवाना केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तो घटनेबाबत माहिती देत नव्हता. दरम्यान जखमींचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. त्यांनी उमाकांतविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करून गोंधळ घातला. उमाकांतची अवस्था पाहून पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यात तो नशेत असल्याचे उघड झाले. जखमी नागरिकांच्या वाहनांकडे पाहून कोणालाही ते जीवंत असतील असे वाटत नव्हते. घटनेच्या वेळी उमाकात वर्दीत होता. तो नशेत असताना ड्युटीवर जात असल्याची शंका आल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. परंतु त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. जरीपटका पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. पोलीस एसआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांना अहवाल पाठविणार आहेत. उमाकांत विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिस