लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उर्वरित बालकांना १५ सप्टेंबरला प्रवेश निश्चित करायचे आहेत.राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. नागपूरमधून ६ हजार ७८४ जागांसाठी ३१ हजार ४४ पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६ हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १७ मार्चला सोडत निघाल्यावर २१ मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत प्रवेश सुरू होते. दरम्यान, राज्य शासनाने त्यावर तोडगा काढून प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला. १ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून घ्यायचे होते. ३१ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ५४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता १५ दिवसाचा पुन्हा अवधी मिळाल्याने पालकांनी लवकरात लवकर पाल्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.उत्पन्नाचे प्रमाणपत्र अवैधआरटीईत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी कागदपत्र पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य मो. शाहीद शरीफ यांनी सांगितले की, काही पालकांचे उत्पन्नाचे दाखले अवैध येत आहेत. त्याचबरोबर जात प्रमाणपत्रदेखील पालकांनी बोगस दिले आहे. या प्रमाणपत्राची संबंधित कार्यालयात नोंदणी नसल्याचे आढळले आहे.
नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:48 IST
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे.
नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ
ठळक मुद्दे पालकांना दिलासा