शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर यंदा 'प्लास्टिक फ्री झोन ' पाळणार

By आनंद डेकाटे | Updated: October 9, 2023 20:05 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत निर्णय

नागपूर : येत्या २४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे होणाऱ्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आढावा सभा घेण्यात आली. स्वच्छता राखण्यासाठी व अनुयायांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन 'प्लास्टिक फ्री झोन ' म्हणून दीक्षाभूमीवर राबवण्यात येईल, असे या बैठकीत सर्व संमतीने ठरले.

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे. हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्रि झोन’, उपक्रम ठरावा. या आयोजनामध्ये यापुढे प्लास्टिकचा वापर होता कामा नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दीक्षाभूमीवरील स्वच्छता पाळताना आणि सुविधा उपलब्ध करताना मनपाच्या स्वच्छता विभागाने प्लास्टिक वापर अडचणीचा ठरत असल्याचे सांगितले. त्यामुळे पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, राजेंद्र गवई, एन. आर. सुटे, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वतीने माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह पोलीस व अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.बाहेरून येणाऱ्या अनुयायांना व्यवस्थेच्या अनुषंगाने कोणताही त्रास होणार नाही. रस्त्यांवर मोठ-मोठे गेट उभे राहून रस्ते अरुंद होणार नाही, खान-पानाच्या व्यवस्थेमध्ये रस्त्यावर घाण राहणार नाही, मोठ्या प्रमाणात कचरापेटींची उपलब्धता तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची विपुल उपलब्धता याची खातरजमा अधिकाऱ्यांनी करावे. तसेच पूरक व्यवस्थेची तयारी झाल्यानंतर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी परस्परांशी समन्वय ठेवून पाहणी करावी असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

आकस्मिक रुग्णसेवेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर तैनात राहणारसर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहतील, तसेच अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्टॉलची रचना राहील. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अनेक तपासण्या मोफत व्हाव्यात, तसेच आकस्मिक रुग्णसेवेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मोठ्या संख्येत तैनाती करण्याबाबतचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर