शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

६७ वर्षांत ३०२ उमेदवारांनी आजमावले भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:43 IST

मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले.

ठळक मुद्दे९४ टक्के उमेदवारांच्या पदरी अपयश१९९६ मध्ये सर्वाधिक ६० उमेदवार रिंगणात

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले. मात्र प्रत्यक्षात यापैकी सुमारे ५ टक्के उमेदवारांनाच यश आले.१९५२ पासूनची आकडेवारी लक्षात घेतली तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३०२ उमेदवार उभे राहिले. यातील १६ उमेदवारांनाच यश मिळाले व ९४.७० उमेदवारांच्या पदरी अपयशच आले. पहिल्या निवडणुकीत केवळ पाच उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर १९७१ पर्यंत स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची संख्या ही १० च्या खालीच राहिली. १९७७ मध्ये पहिल्यांदा १० उमेदवार निवडणुकांत उभे होते. त्यानंतर सातत्याने हा आकडा वाढत गेला व १९९१ साली तर ४६ उमेदवारांमध्ये लोकसभेसाठी चढाओढ होती. मात्र १९९६ ची निवडणूक ही नागपूरसाठी ऐतिहासिक राहिली. यावेळी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० उमेदवार रिंगणात होते व मतदारांमध्येदेखील बराच संभ्रम निर्माण झाला होता. उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये ४६ उमेदवार हे अपक्ष होते. त्यानंतर मात्र अचानक उमेदवारांची संख्या ८ वर आली. २००९ मध्ये २७ तर मागील निवडणुकीत ३३ उमेदवार एकमेकांविरोधात उभेझाले होते.२०१ उमेदवार अपक्षआश्चर्याची बाब म्हणजे १६ निवडणुकांमध्ये नागपुरातून २०१ उमेदवार हे अपक्ष म्हणून उभे राहिले. यातील केवळ बापूजी अणे यांनाच यश मिळाले होते. १९९६ साली सर्वाधिक ४६ उमेदवार रिंगणात होते. तर १९९१ साली ३६ उमेदवारांनी भाग्य आजमावले होते. १९८४ व १९८९ साली प्रत्येकी २२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. तर मागील निवडणूकांत २१ अपक्षांनी आव्हान दिले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक