शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  चौथ्या दिवशी ६७ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 22:04 IST

vaccination, nagpur news कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या चौथ्या दिवशीचे चित्र समाधानकारक होते. ६७.९७ टक्के लसीकरण झाले. विशेष म्हणजे, मनपाच्या पाचपावली लसीकरण केंद्रावर १०२ टक्के, तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) केंद्रावर १०० टक्के लसीकरण झाले.

ठळक मुद्देएम्समध्ये १०० टक्के तर, पाचपावली केंद्रात १०२ टक्के लाभार्थ्यांना लस

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या चौथ्या दिवशीचे चित्र समाधानकारक होते. ६७.९७ टक्के लसीकरण झाले. विशेष म्हणजे, मनपाच्या पाचपावली लसीकरण केंद्रावर १०२ टक्के, तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) केंद्रावर १०० टक्के लसीकरण झाले. सर्वांत कमी लसीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) केंद्रावर झाले.

शासनाच्या निर्णयानुसार नागपूर ग्रामीणमध्ये मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार याच दिवशी लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज ग्रामीण भागातील सातही केंद्रांवर लसीकरण बंद होते. मात्र, शहरातील पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. ‘एम्स’ला १०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यांनी ते पूर्ण केले. मेडिकलला दिलेल्या १०० टक्के लसीकरणाच्या लक्ष्यामध्ये २१ टक्केच लसीकरण झाले. डागा रुग्णालयाच्या केंद्रावर १००पैकी ४० टक्के, मेयोमध्ये १००पैकी ७५ टक्के, तर पाचपावली केंद्रावर १०० टक्केपैकी १०२ टक्के लसीकरण झाले.

मेडिकलच्या कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद

मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर आज मेडिकलच्याच कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार होती. त्यानुसार १०० कर्मचाऱ्यांची यादी आली. परंतु यातील २१ कर्मचारी लसीकरणासाठी पुढे आले. मेडिकलमध्ये वरिष्ठ डॉक्टरांपासून ते परिचारिकांनी लस घेतली असताना कर्मचारी मागे राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केंद्र   लक्ष्य     लसीकरण

एम्स १००     १००

मेडिकल १००   २१

डागा १००     ४०

मेयो १००     ७५

पाचपावली १००  १०२

एकूण ५००       ३३८

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसnagpurनागपूर