शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

६६ लाख कोवळी मुले अत्याचाराचे बळी; राजीव सेठ यांची धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:18 IST

६६ टक्के मुले शारीरिक, ५० टक्के मुले ही लैंगिक तर ६० टक्के मुले ही भावनिक व मानसिक अत्याचाराला बळी पडल्याचे सामोर आले, अशी धक्कादायक माहिती ‘इंडियन चाईल्ड अब्युज नेगलेक्ट अ‍ॅण्ड चाईल्ड लेबर’चे (आयकॅन्सल) अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठ यांनी दिली.

ठळक मुद्देआजही होतात २८ टक्के बालविवाह ज्यांच्याकडे आपण आपले उज्ज्वल भविष्य म्हणून पाहतो, त्यांना प्रेम, संरक्षण, शिक्षण, आधार देण्याच्या वयात त्यांच्या बालमनावर ओरखडे उमटवणारे अत्याचार केले जातात. यातीलच एक प्रकार म्हणजे, बाल विवाह. भारतात आजही २८ टक्के बालविवाह हआवर घालण्यासाठी केवळ ०.५ टक्के निधी मुलांच्या लैंगिक, शारीरिक, मानसिक व भावनिक अत्याचाराला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात केवळ ०.५ टक्के निधी खर्च केला जातो. हा निधी फारच तटपुंजा असून सरकारची यातून उदासिनता दिसून येते. बाल शोषणाला आवर घालण्

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात शून्य ते १८ वयोगटातील सुमारे साडेचार दशलक्ष मुले आहेत. यापैकी सहा वर्षांच्या आतील दीड दशलक्ष मुले आहेत. यातील दोनतृतीयांश म्हणजे साधारण ६६ लाखांच्या कोवळ्या वयातील मुले- मुली लैंगिक, शारीरिक, मानसिक व भावनिक अत्याचाराला बळी पडतात. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी १३ राज्यांमधील मुलांच्या शोषणाचा अभ्यास केला असता ६६ टक्के मुले ही शारीरिक, ५० टक्के मुले ही लैंगिक तर ६० टक्के मुले ही भावनिक व मानसिक अत्याचाराला बळी पडल्याचे सामोर आले, अशी धक्कादायक माहिती ‘इंडियन चाईल्ड अब्युज नेगलेक्ट अ‍ॅण्ड चाईल्ड लेबर’चे (आयकॅन्सल) अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव सेठ यांनी दिली.संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मुलांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी दिशादर्शक तत्त्व तयार करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यावर डॉ. सेठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी ‘पेडीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना ते बोलत होते.

‘पोक्सो’मध्येही पळवाटाडॉ. सेठ म्हणाले, कोवळ्या वयातील मुला-मुलींना कधी आपल्या नातलगांकडून, परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. अनेकदा पालकांची इच्छा असूनही बदनामी होईल, या भीतीपोटी तक्रार करीत नाही. बालकांवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून २०१२ मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) तयार करण्यात आला आहे. परंतु यातही पळवाटा आहेत. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हा