नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये सिग्नल अँड टेलिकॉम विभागातील ६५ कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन नेहमी रेल्वेचे खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देते. सिग्नल अँड टेलिकॉम विभागातील जवाहर कोदलीकर, भोजराज तायडे, जेरील पाल, एस. आर. राव, मिलन टोपने, एस. दत्ता यांच्यासह ६५ रेल्वे कर्मचाऱ्यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये प्रवेश केला. यावेळी युनियनचे मुख्यालय कार्यकारी अध्यक्ष हबीब खान, विभागीय सचिव एस. के. झा, प्रमोद बोकडे, नरेंद्र धानफोले, ममता राव, बेबीनंदा मोठे, मनोज चौथानी, आसिफ अली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईवान पाल, सुनील कापटे, योगेश मंडपे, राहुल गजभिये, लांजेवार, अजय पाटील यांनी सहकार्य केले.
..........