शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

६३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : धम्मदीक्षेचा मुख्य सोहळा मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:53 IST

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देथायलंडचे भदन्त अनेक व म्यानमारचे बौद्ध उपासक टेंग ग्यॉर मुख्य अतिथी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा अनेक व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार उपस्थित राहतील, अशी माहिती स्मारक समितीच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.

याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, कैलास वारके उपस्थित होते.गजघाटे म्हणाले, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. धम्मदीक्षा सोहळ्याला शनिवार ५ ऑक्टोबरपासून महिला धम्म मेळाव्याने सुरुवात झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या उपस्थितीत धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला भदन्त करुणा राहुल, भदन्त नागवंश, भदन्त धम्मसारथी, भदन्त नागाप्रकाश यांच्यासह जपान, थायलंड, मलेशिया व इतर विदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. सायंकाळी ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’ या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येईल.डॉ. फुलझेले म्हणाले, या सोहळ्याच्या दरम्यान पाऊस आल्यास अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून दीक्षाभूमीच्या परिसरात असलेल्या सर्व शाळांमध्ये आश्रयाची सोय करण्यात आली आहे. शिवाय, अनुयायांना थांबण्याकरितासुद्धा या शाळा उघड्या ठेवल्या जाणार आहेत. आरोग्याची विशेष सोय उपसंचालक आरोग्य विभागाने माताकचेरी परिसरात केली आहे, असेही ते म्हणाले.३५० कोटीमधील ४० कोटींना प्रशासकीय मंजुरीच नाहीएका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. फुलझेले म्हणाले, दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाने ३५० कोटींना मंजुरी दिली. परंतु पहिल्या टप्प्यातील ४० कोटींना अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. बांधकामाची जबाबदारी पूर्वी नागपूर सुधार प्रन्यासकडे व आताच्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे आहे. परंतु प्रशासकीय मंजुरीच नसल्याने निविदा प्रक्रिया रखडलेल्या आहेत.दीक्षाभूमीच्या स्तुपाच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटीडॉ. फुलझेले म्हणाले, दीक्षाभूमीच्या स्तुपाला भेगा पडल्या आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने नऊ कोटी रुपये दिले आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील ४० लाखाचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाला आहे. यामुळे दुरुस्तीच्या कार्याला सुरुवात झाली असून, घुमटावरील काचेचे टाईल्स काढून भेगा भरून नंतर पुन्हा काचेचे टाईल्स लावले जाणार आहे. याला साधारण दीड वर्षाचा कालावधी लागेल. संपूर्ण काम झाल्यावर पूर्वीसारखेच स्तुप दिसेल.दीक्षाभूमीच्या दानपेटीतून मिळाले ४९ लाखदीक्षाभूमीच्या दानपेटीत जमा झालेल्या पैशांची गेल्या दोन दिवसापासून मोजणी सुरू आहे. याची माहिती देताना डॉ. फुलझेले म्हणाले, गेल्या दोन दिवसात दानपेटीतून ४९ लाख रुपये मिळाले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीReligious programmeधार्मिक कार्यक्रम