शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

६२ सुवर्णपदके विजेती पृथ्वी दहावीतही १०० टक्के सक्सेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:58 IST

म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.

ठळक मुद्देखेळासोबत शिक्षणातही भरारी : सैन्यात जाऊन वैद्यकीय सेवा करायचे ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.शहरात मार्शल आर्टची नॅशनल प्लेअर म्हणून पृथ्वी अनिल राऊत प्रसिद्ध आहे, कारण तिची खेळातील भरारी नेत्रदीपक आहे. वयाच्या अडीच वर्षापासून पृथ्वी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे. मार्शल आर्टच्या सहा राष्ट्रीय स्पर्धा, बॉक्सिंगमध्येही राज्यस्तरावर यशस्वी वाटचाल. उत्कृष्ट जलतरणपटू, संगीत क्षेत्रात विशारदकडे वाटचाल, जे.एन. टाटा पारसीची स्कूल प्रेसिडंट, अवघ्या १५ ते १६ व्या वर्षात ६२ मेडल, हे यशाचे वलय तिच्या पाठीशी लागले आहे. आता तर दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवीत स्वत:ला आॅलराऊंडर सिद्ध केले आहे. परीक्षेच्या तोंडावर अंदमान-निकोबारला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले आहे. दहावीचे वर्ष असतानाही पृथ्वीने खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. पहाटे उठून रनिंग करणे, सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत शाळा, त्यानंतर ६ ते ७ खासगी शिकवणी आणि ७ ते ९ प्रॅक्टिस अशी तिची दिनचर्या वर्षभर होती. शाळेत शिकविलेले रात्री वाचणे आणि होमवर्क पूर्ण करणे हाच तिचा अभ्यास. शाळेला कधी खंड पाडला नाही. उलट स्कूल प्रेसिडंट असल्यामुळे प्रत्येक उपक्रमात तिचा सहभाग असायचा. पण अंदमानहून नॅशनल खेळून आल्यानंतर एक महिना तिने झपाटून अभ्यास केला. शाळेतील मीना देवनानी, अबान भंगारा आणि सीमा जोशी याचबरोबर रवींद्र गायकी यांचे मार्गदर्शन मिळाल्याने ती शिक्षणातही यशस्वी होऊ शकली. पृथ्वीवर तिची आजी मीराबाई यांचे खूप प्रेम आहे. आजीची इच्छा तिला सैन्यात पाठविण्याची आहे. त्यासाठी पृथ्वीने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे निश्चित केले आहे. भारतीय सेनेला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ‘एएफएमसी’ कॉलेजमधून तिला एमबीबीएस करायचे आहे. खेळण्यामुळे आत्मविश्वास वाढला. टेन्शन आणि भीती माझ्यातून निघून गेली आहे. खेळण्यातून मिळालेल्या ऊर्जेमुळे माझे ध्येय मी गाठू शकणार आहे.पृथ्वी राऊत माझी मुलगी कुठल्याच क्षेत्रात कमी नाही. जे ध्येय तिने ठरविले आहे ते आपल्या जिद्दीवर नक्कीच पूर्ण करेल. माझी मुलगी देशाच्या कामी यावी, अशी माझीही इच्छा आहे.वंदना राऊत, पृथ्वीची आई

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर