शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

नागपुरात ८४ दिवसात ६१३ रुग्ण : सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 23:31 IST

तापमानात मोठी घट आली असली तरी कोरोनाच्या प्रादुुुुर्भावात वाढ झाली आहे. रविवारी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बांगलादेश व नाईक तलाव येथल सहा, मोमिनपुरा येथील पाच, टिमकी येथील तीन तर इतर वसाहतीतील ११ रुग्ण आहेत. याशिवाय पाच रुग्ण नागपूर बाहेरील आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सारीचे तीन रुग्ण आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६१३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, रुग्णांचा हा आकडा गाठायला ८४ दिवसांचा कालावधी लागला आहे.

ठळक मुद्दे३० नव्या रुग्णांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमानात मोठी घट आली असली तरी कोरोनाच्या प्रादुुुुर्भावात वाढ झाली आहे. रविवारी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बांगलादेश व नाईक तलाव येथल सहा, मोमिनपुरा येथील पाच, टिमकी येथील तीन तर इतर वसाहतीतील ११ रुग्ण आहेत. याशिवाय पाच रुग्ण नागपूर बाहेरील आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सारीचे तीन रुग्ण आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६१३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, रुग्णांचा हा आकडा गाठायला ८४ दिवसांचा कालावधी लागला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमिनपुरा येथील १४ वर्षीय मुलगी, ४० वर्षीय महिला व १८, २० व ४० वर्षीय पुरुष अशा पाच रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होते. आज पुन्हा बांगलादेश वसाहतीतील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण लॉ कॉलेज वसतिगृहात क्वारंटाईन होते. या वसाहतीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली आहे. नरखेड तालुक्यातील मन्नानखेडी येथील आणखी तीन रुग्णांची नोंद झाली. सहा दिवसापूर्वी मुंबईवरून आलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर या गावातकोरोनाबाधितांची संख्या पाच झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये वडील, मुलगा व आणखी एक रुग्ण आहे. हे तिघेही लॉ कॉलेजमध्ये क्वारंटाईन होते. याच प्रयोगशाळेत रात्री पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये टिमकी येथील तीन, भानखेडा, गांधीबाग, शांतिनगर व एका खासगी हॉस्पिटलमधील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर अकोला येथील महिला रुग्णाचा मेयोत उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांना कोव्हिडची लागण झाल्याचे निदान झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेतून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मोमिनपुरा व जबलपूर येथील प्रत्येकी एक तर सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी प्रयोशाळेतून एक तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून गोळीबार चौक येथील एक रुग्ण असे ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.नागपूर, अमरावती व चंद्रपूर येथून सारीचे रुग्ण‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ची (सारी) एक ७० वर्षीय महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला नागपुरातील भगवाननगर येथील रहिवासी आहे. याशिवाय अमरावती व चंद्रपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा नमुनाही पॉझिटिव्ह आला आहे. या तिन्ही रुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. नागपुरातील रुग्णालयात नोंद झालेल्या सारीच्या ५०० वर रुग्णांमधून आतापर्यंत ११ रुग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सारीच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पाच दिवसात १०० रुग्ण राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’नुसार खेळ, व्यायामाशी जुळून असलेल्या प्रकारांना ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता देण्यात आली आहे. असे असताना गेल्या पाच दिवसात १०० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुसंख्य रुग्ण क्वारंटाईन सेंटरमधील असल्याने दिलासादायक आहे. नागपुरात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. २४ एप्रिल रोजी १०० रुग्णांची नोंद झाली. पहिली शंभरी गाठण्यासाठी ४४ दिवस लागले. १२ दिवसानंतर म्हणजे १६ मे रोजी २०० रुग्णांची नोंद झाली. नंतरच्या सहा दिवसात, १२ मे रोजी ३०४ रुग्णांची संख्या झाली. २१ मे म्हणजे नऊ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ४०० झाली. २९ मे रोजी ४३ रुग्णांचा उच्चांक गाठल्याने ५०१ रुग्णांची संख्या झाली. म्हणजे आठ दिवसात १०० रुग्णांची वाढ झाली, तर आता ३ जून रोजी ६०२ रुग्णांची नोंद झाली. गेल्या पाच दिवसात हे १०० रुग्ण आढळून आले.पाच रुग्णांना रुग्णालयातून सुटीमेडिकलमधून चार रुग्णांना सुटी देण्यात आली. यात गोळीबार चौक येथील एक, मोमिनपुरा येथील तीन रुग्णांचा तर एम्समधून बुटीबोरी येथील बुटीबोरी येथील ५२ वर्षीय रुग्णाला सुटी देण्यात आली. आज पाच रुग्णांंना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ४०४ वर पोहचली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १३५दैनिक तपासणी नमुने १८७दैनिक निगेटिव्ह नमुने १६९नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६१३नागपुरातील मृत्यू ११डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४०४डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २८५०क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १५२०पीडित-६१३-दुरुस्त-४०४-मृत्यू-११

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर