शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात रविवारी ६१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या ८३५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 19:13 IST

विदर्भात एकीकडे ‘लॉकडाऊन’ शिथील केले जात असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ६१ रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात एकाच दिवशी ३७ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. नागपुरात १५ रुग्ण व एक मृत्यू तर बुलढाणा आणि अमरावतीत प्रत्येकी ३ रुग्णांचे निदान झाले.

ठळक मुद्देअकोल्यात ३७ रुग्ण १ मृत्यू नागपुरात १५ रुग्ण एक मृत्यूबुलढाणा व अमरावतीत प्रत्येकी ३ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात एकीकडे ‘लॉकडाऊन’ शिथील केले जात असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ६१ रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात एकाच दिवशी ३७ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. नागपुरात १५ रुग्ण व एक मृत्यू तर बुलढाणा आणि अमरावतीत प्रत्येकी ३ रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची एकूण संख्या ८३५वर पोहचली आहे. अकोल्यात रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवारी ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २५७वर पोहचली आहे. यात एका ४८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू आहे. मृत्यूनंतर नमुना पॉझिटिव्ह आला. या जिल्ह्यात आता पर्यंत १८ मृताची नोंद झाली असून यात एका रुग्णाने आत्महत्या केली आहे. नागपुरातही एका ५६ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी घरीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर नमुना तपासला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या मृत्यूने मृतांची संख्या ६ झाली आहे. या शिवाय, १५ नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ३५६वर पोहचली आहे. यातील १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत २०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अमरावती जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली आहे. विदर्भात शंभरी गाठणारा हा चवथा जिल्हा आहे. येथील मृताची संख्या १३ असून ६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्यानंतर सलग १९ दिवस रुग्ण आढळून आला नव्हता. येथे नोंद झालेले २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. ग्रीनझोनकडे या जिल्ह्याची वाटचाल सुरू होती. मात्र शनिवारी रात्री उशीरा दोन तर रविवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे येथील आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रीय झाली आहे. या जिल्ह्यात रुग्णांची संख्या २९ झाली असून एका मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील सहा दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही. येथील रुग्णांची संख्या स्थिर आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस