एटीएम कार्ड बदलवून काढले पैसे : अजनी पोलिसात गुन्हा दाखल नागपूर : महिलेच्या हातात दुसरेच एटीएम कार्ड देऊन तिच्या जवळच्या कार्डच्या माध्यमातून दोघांनी महिलेच्या सासू-सासऱ्याच्या खात्यातून ६० हजार रुपये लंपास केले. १२ एप्रिलला घडलेल्या या प्रकरणाची माहिती १८ एप्रिलच्या सकाळी उजेडात आली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगीनगर, रामेश्वरी भागात राहणाऱ्या शीतल देवेंद्र वैरागडे (वय ३२) १२ एप्रिलला दुपारी १२.३० च्या सुमारास ॐ श्रीनगर (नरेंद्रनगर) येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गेल्या. एटीएम कार्ड हाताळण्याची पद्धत माहीत नसल्याने त्यांना रक्कम काढता आली नाही. त्यावेळी तेथे उभे असलेल्या दोन आरोपींनी शीतल यांच्या जवळचे एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बनाव करून दुसरेच एटीएम कार्ड शीतल यांना परत केले. पुढच्या दोन तासात आरोपींनी शीतल यांच्या सासू-सासऱ्यांच्या नावे असलेल्या संयुक्त खात्यातून ६० हजार रुपये काढून घेतले. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर शीतल यांनी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
दाम्पत्याच्या खात्यातून ६० हजार लंपास
By admin | Updated: April 19, 2017 02:50 IST