शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

राज्यातील ६० टक्के लॉकर्स असुरक्षित; नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 10:11 IST

सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देराज्यात सुमारे १,००,००० लॉकर्सपतसंस्था लॉकर्ससंबंधी नियम पाळत नाहीत

सोपान पांढरीपांडे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमांशी सुसंगत लॉकर रूम्स प्रचंड महाग आहेत. परंतु तशाच दिसणाऱ्या साध्या पत्राच्या लॉकर रूम बऱ्याच स्वस्त आहेत म्हणून बहुतेक अर्बन बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या या स्वस्त लॉकर रूमचा वापर करतात.यासंबंधी बोलताना महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी अर्बन बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोट पालन करीत नाहीत, हे मान्य केले. महाराष्ट्रात ५०० अर्बन बँकांच्या ५,६२८ शाखा आहेत व लॉकर्सची संख्या १२ ते १५ लाख असावी. यापैकी फार तर ४० टक्के लॉकर्स रिझर्व्ह बँकेच्या नियमात बसतील, असेही अनासकर म्हणाले. अनासकर हे पुण्याच्या विद्या सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. विद्या सहकारी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पूर्णत: पालन करते, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.पण याबद्दल अनासकर यांनी रिझर्व्ह बँकेला दोष दिला. रिझर्व्ह बँक अर्बन बँकांना लायसन्स देते व दरवर्षी इन्स्पेक्शनही करीत असते. एखादी बँक जर लॉकरसंबंधी नियम पाळत नसेल तर रिझर्व्ह बँकेने ते तपासणी अहवालात नोंदवून तशी पूर्तता करून घ्यायला हवी, असे अनासकर म्हणाले.महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांवर रिझर्व्ह बँकेचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक नाही म्हणून बहुतेक पतसंस्था लॉकरसंबंधी नियम पाळत नाहीत. पण हे अयोग्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी त्यांनी लॉकरसंबंधी नियम पाळलेच पाहिजे, असे बंधन सहकार खात्याने पतसंस्थांवर घातले पाहिजे. आपण सहकार खात्याला तशी विनंती करू, असेही कोयटे म्हणाले.कोपरगावच्या समता सहकारी पतसंस्थेचे असलेले कोयटे यांनी महाराष्ट्रात १६,००० पतसंस्था त्यापैकी २००० पतसंस्थांचे १,००,००० लॉकर्स असावेत, अशी माहितीही दिली.इंडियन बँक्स असोसिएशनचे सीईओ जी. व्ही. कन्नन यांच्याशी दोन दिवस प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. देशातील सरकारी बँका, विदेशी बँका, अर्बन को-आॅपरेटिव्ह बँका व खासगी बँका अशा २४० बँकांचे व त्यांच्या १.४५ लाख शाखांचे प्रतिनिधित्व आयबीए करते.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMONEYपैसा