शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 21:02 IST

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिसेंबरअखेर हे कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी मोतिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआर. एस. चौहान यांची माहिती : रेल्वे सुरक्षा दलात चार श्वानांचा समावेश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया, भंडारा, इतवारी रेल्वे स्थानकावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डिसेंबरअखेर हे कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी मोतिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिल्लीवरून प्रशिक्षण घेऊन आलेल्या चार श्वानांचा समावेश त्यांच्या हस्ते आरपीएफमध्ये करण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दल विविध उपाययोजना करीत आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या नऊ पोस्टला चारचाकी वाहने पुरविण्यात येणार आहेत. यात छिंदवाडा, नागभीड, इतवारी, भंडारा, गोंदिया, राजनांदगाव, डोंगरगड, नैनपूरचा समावेश आहे. याशिवाय ८६ वॉकीटॉकी रेल्वे सुरक्षा दलासाठी मागविण्यात आल्या आहेत. रेल्वेगाड्यात गस्त घालणाऱ्या आरपीएफ जवानांसाठी ३० बॉडी वेअर कॅमेरे मागविण्यात आले आहेत. यात १० तास चित्रीकरण करण्याची सुविधा राहणार आहे. पूर्वी दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात १० बॉडी वेअर कॅमेरे होते. रात्री गस्त घालताना आरपीएफ जवानांना दूर पाहता यावे यासाठी ५६ टॉर्च मागविण्यात आले आहेत. अंधारात दीड किलोमीटरवरील दृश्य या टॉर्चच्या साह्याने पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त अमर कुमार स्वामी, निरीक्षक डोंगरे, सहायक उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन उपस्थित होते.आरपीएफच्या पथकात चार प्रशिक्षित श्वानदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात चार प्रशिक्षित श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीच्या दया वसती येथून हे श्वान आठ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत. विविध झोनमधील श्वानात या चारही श्वानांचा प्रथम क्रमांक आला आहे. यातील दोन श्वान गोंदिया आरपीएफमध्ये तर दोन श्वान नागपूर विभागात सेवा देणार आहेत. नागपूर विभागातील मोतिबागमध्ये लेब्राडोर जातीचा रॉकी आणि जर्मन शेफर्ड जातीचा मॅक्स हे श्वान सेवा देतील. स्फोटकांचा शोध घेण्याची क्षमता या श्वानांमध्ये आहे. दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात छिंदवाडा, नैनपूर, राजनांदगाव आणि नागभीड येथे श्वान पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी श्वान खरेदी करून ते प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेcctvसीसीटीव्ही