शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

अखेर ५८ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सोंटू जैनची शरणागती

By योगेश पांडे | Updated: October 16, 2023 16:57 IST

अनेक दिवसांपासून होता फरार : चौकशीतून अनेक तथ्य समोर येण्याची शक्यता

नागपूर : ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली नागपुरातील व्यापाऱ्याला ५८ कोटींचा गंडा घालणारा सोंटू जैन या आरोपीने अखेर सोमवारी प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरणागती पत्करली. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्यानंतर त्याच्यासमोर हाच पर्याय शिल्लक राहिला होता.

मागील काही दिवसांपासून सोंटू फरार होता व त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सोंटूला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून मंगळवारी त्याला न्यायालयात सादर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल.

२७ सप्टेंबरला उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर सोंटू हा त्याचा मित्र आणि गोंदियातील गुन्हेगार विक्की यादवसह नागपुरातून फरार झाला होता. विक्की अजूनही सोंटूसोबत आहे. ९ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टानेही सोंटूचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला पोलिसांना शरण येण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सोंटू आणि त्याच्या कुटुंबीयांच्या शोधण्यासाठी एक पथक राजस्थानला पाठविले होते.

सोंटू कधीही आत्मसमर्पण करू शकतो याची पोलिसांना कल्पना होती. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्याने प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरमागती पत्करली. त्याला लगेच गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व मंगळवारी पोलीस कोठडीच्या मागणीसाठी न्यायालयासमोर सादर करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूरCourtन्यायालय