शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोविड-१९ लॉकडाऊनमुळे उपराजधानीतील औद्योगिक क्षेत्रात ५७ हजार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:17 IST

कोविड-१९ या महामारीने लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या चार मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ ५७ हजार लोक बेरोजगार झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदररोज ५१.२० कोटींचे उत्पादन ठप्प केवळ फार्मा व फूड युनिट सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ या महामारीने लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या चार मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ ५७ हजार लोक बेरोजगार झाल्याची माहिती आहे.सुरुवातीला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १९ मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली. २१ दिवसाच्या टाळेबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीचे आकलन करण्यासाठी लोकमतने हिंगणा, बुटीबोरी आणि कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मिहान-सेझच्या बाबतीत प्रयत्न निष्फळ ठरले आणि एकूण औद्योगिक क्षेत्राचा अंदाज तेथील युनिटधारकांच्या अंदाजानुसार आहे.एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष (एमआयए) चंद्रशेखर शेगावकर म्हणाले, टाळेबंदी होण्यापूर्वी हिंगणा औद्योगिक क्षेत्रात १०५० युनिट कार्यरत होते आणि दररोजचे उत्पादन १८ ते २० कोटी रुपये होते. सध्या केवळ ३५ युनिट कार्यरत आहेत आणि एक ते दीड कोटी रुपयांच्या वस्तूंचे उत्पादन करतात. लॉकडाऊन होण्यापूर्वी हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ३० हजार नोकºया उपलब्ध होत्या, पण सध्या ते केवळ एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बीएमए) अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ५५० युनिट आहेत. यापैकी केवळ २० ते २३ युनिट मुख्यत: अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण व पॅकेजिंगमध्ये कार्यरत आहेत. लॉकडाऊन होण्यापूर्वी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र जवळपास २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होते. आता या संख्येत घट होऊन आकडा १,१०० वर आला आहे. दैनंदिन उत्पादन ३० कोटी रुपयांवरून घसरून २ कोटींपर्यंत कमी झाले आहे.कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात ८५ युनिट असून त्यातील सर्वात मोठे जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू) हे रंगीत स्टील शीटचे युनिट आहे. जेएसडब्ल्यू युनिटमध्ये जवळपास एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत, पण हे युनिट सध्या बंद आहे. कळमेश्वरमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात फक्त पाच लहान युनिट कार्यरत आहेत. एकूण रोजगार २६०० वरून ५०० पर्यंत खाली आला आहे आणि उत्पादन ५ कोटींवरून घसरून २० ते ३० लाखांपर्यंत आले आहे.मिहान-सेझ भागातील युनिटची माहिती देण्यासाठी एमएडीसीचा कोणताही अधिकारी उपलब्ध नसला तरी तेथील कार्यरत सूत्रांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात ७० युनिट आहेत आणि त्यातील २० माहिती तंत्रज्ञान (आयटी) युनिट आहेत. या युनिटमध्ये जवळपास ४,५०० लोक कार्यरत आहेत. बहुतेक आयटी घटकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नोकरीची नेमकी हानी केवळ दोन हजाराच्या आसपास होऊ शकते.कोविड-१९ लॉकडाऊनमुळे नागपुरातील उद्योगांवर झालेला परिणामऔद्योगिक क्षेत्र युनिटची संख्या कामगार/कर्मचारी परिचालन युनिट कामगार/कर्मचारी गमावलेल्या नोकºयाहिंगणा १,०५० ३०,००० ३५ १,००० २९,०००बुटीबोरी ५५० २५,००० २३ १,१०० २३,९००कळमेश्वर ८५ २,६०० ५ ५०० २,५००मिहान-सेझ ७० ४,५०० १५ २,५०० २,०००एकूण १,८०५ ६२,१०० ७८ ५,१०० ५७,४००- दैनंदिन उत्पादन (अंदाजे) ५५ कोटी रुपये, सध्या उत्पादन ३.८० कोटी रुपये, दैनंदिन उत्पादन ठप्प (अंदाजे) ५१.२० कोटी रुपये.- लॉकडाऊनमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख युनिटमध्ये मुख्यत्त्वे फार्मास्युटिकल आणि फूड युनिटचा समावेश आहे. बहुतांश युनिट बुटीबोरीमध्ये सुरू आहेत.- हिंगणा आणि कळमेश्वरमध्ये सुरू असलेल्या युनिटमध्ये अल्कोहोल आधारित सॅनिटायझर्स, मास्क आणि औषधे तयार करीत आहेत.- वर्कफोर्स डेटामध्ये हेडलोड कामगार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेसन्स, ड्रायव्हर्स, सफाई कामगार दरदिवशी कार्यरत आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस