शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णामुळे तब्बल २८ दिवसापासून ५५ दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:47 IST

गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.

ठळक मुद्देव्यवसाय ठप्प : दुकाने उघडण्याची व्यापाऱ्यांची मनपाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.निवासी संकुलात एका फ्लॅटमध्ये १८ जूनला एक कोरोना रुग्ण आढळून आला. या रुग्णाला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णावर उपचार करून सात दिवसात सुटी देण्यात आली. तो रूग्ण कामानिमित्त आता शहरात फिरत आहे. पण त्याची शिक्षा दुकानदारांना २८ दिवसांपासून भोगावी लागत आहे. रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील व्यावसायिक संकुलातील दोन इमारतीचे प्रवेशद्वार कठडे लावून बंद केले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली. १९ जूनपासून १६ जुलैपर्यंत दुकाने उघडली नाहीत. या दरम्यान व्यापाऱ्यांनी धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे यांना निवेदन दिले. त्यांनी सात दिवसात दुकाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १४ दिवसानंतर सुरू करू, असे सांगितले. पण आता २८ दिवस झाल्यानंतरही दुकाने सुरू झाली नाहीत.कोरोना रुग्णाची शिक्षा आम्हाला का?कोरोना रुग्ण बरा होऊन शहरात फिरत आहे, पण आमची दुकाने बंद आहेत. या रुग्णााची शिक्षा आम्हाला का? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका दुकानदाराने सांगितले की, राज्य शासनाच्या १९ मार्चच्या लॉकडाऊननंतर दुकाने तब्बल अडीच महिने बंद होती. ४ जून महिन्यात दुकाने सुरू झाली, पण १९ जूनपासून मनपाने पुन्हा दुकाने बंद केली. या संकुलात ट्रॅव्हलची कार्यालये, प्रिटिंग प्रेस, हॉटेल, स्टेशनरी आणि अनेक आवश्यक वस्तूंची दुकाने आहेत. सर्वांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दुकान खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरावे लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना रुग्णाचे निवास आणि दुकानांमध्ये जवळपास ६० ते ७० मीटरचे अंतर आहे. अशावेळी मनपाने दुकाने उघडण्यास हवी होती. सहायक आयुक्त बागडे फाईल मनपाच्या मुख्य कार्यालयात पाठविल्याचे सांगत आहेत. पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. दुकाने सुरू होण्याची व्यापारी वाट पाहात आहेत.२८ दिवसानंतर परिसर खुला करूकोरोना रुग्ण आढळल्यानंतर परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येतो. परिसर आणि घटनेची माहिती सहायक आयुक्तांकडून घेऊ. फाईल बघितल्यानंतर परिसर खुला करण्यावर निर्णय घेण्यात येईल.राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर