शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘पीएफ’चे ५४ कोटी नागपूर महापालिकेकडे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:29 IST

महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५४ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देबिकट आर्थिक स्थितीचा फटकाकर्मचारी व शिक्षकात अस्वस्थता

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनातून दरमहा भविष्य निधीची कपात करण्यात येते. मागील तीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ५४ कोटींची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही. वेळोवेळी मागणी करूनही ही रक्कम जमा होत नसल्याने कर्मचारी व शिक्षकात अस्वस्थता पसरली आहे.२०१७ सालापासून कर्मचारी व शिक्षकांना त्यांच्या खात्यात भविष्य निधीची रक्कम वळती केल्याच्या पावत्या मिळालेल्या नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विभागाकडे वळती करणे बंधनकारक आहे. मात्र मागील काही वर्षापासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम दुसऱ्या कामावर खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.कर्मचाऱ्यांना पावत्या मिळत नसल्याने आपल्या खात्यात भविष्य निर्वाह निधीची किती रक्कम जमा झाली याची माहिती त्यांना मिळत नाही. अडचणीच्या प्रसंगी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढतात. परंतु त्यांच्याकडे पावत्या नसल्याने व किती रक्कम जमा झाली याची माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर बँकेच्या तुलनेत अधिक व्याज मिळते. परंतु वेळेवर रक्कमच भरली जात नसल्याने व्याजाची रक्कम कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनातून कपात करण्यात आलेल्या या रक मेचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाची आहे. परंतु २०१७ पासून कर्मचाºयांना पावत्या मिळालेल्या नाहीत. कर्मचारी व शिक्षक संघटनांनी वेळोवेळी पावत्यांची मागणी करून दर महिन्याला कपात होणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याची मागणी केली. परंतु याची दखलच घेतली जात नसल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

टप्प्याटप्प्याने रक्कम भरणारकर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम नेमकी किती आहे याची माहिती देता येणार नाही. परंतु ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती व गेल्या काही वर्षात वित्त विभागाचा कारभार प्रभारीवर असल्याने याकडे दुर्लक्ष झाले असावे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्माण निधी व अंशदायी पेन्शन योजनेची रक्कम किती आहे. याची माहिती घेऊन ती भरण्याचे नियोजन केले जात आहे.- अनंता मडावी, प्रमुख लेखा ववित्त अधिकारी महापालिका

कर्मचारी व शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकारवेतनातून कपात के लेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम २०१७ पासून महापालिके ने वळती केलेली नाही. तीन वर्षापासून पावत्या मिळालेल्या नाही. गटविमा योजनेचेही ६ ते ७ कोटी भरलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या हक्काचा हा पैसा आहे. न भरलेल्या रकमेवर व्याज कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.- राजेश गवरे, अध्यक्षना.म.न.पा.शिक्षक संघ

अंशदायी पेन्शन योजनेचे ३० कोटी भरलेच नाही२००५ सालानंतर नोकरीत लागलेल्या कर्मचारी व शिक्षकांना पेन्शन मिळत नाही. त्यांच्यासाठी राज्य शासनाने अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून ही योजना लागू करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतनाच्या १० टक्के रक्कम कपात करून व तितकाच वाटा महापालिकेला या योजनेत जमा करावयाचा आहे. परंतु आजवर ही रक्कम अंशदायी पेन्शन योजनेत जमा केलेली नाही. ही थकीत रक्कम ३० कोटीहून अधिक आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाProvident Fundभविष्य निर्वाह निधी