अस्वच्छता करणाऱ्या ६८ लोकांकडून ५१ हजाराचा दंडाची वसूली
By मंगेश व्यवहारे | Published: April 4, 2024 09:38 PM2024-04-04T21:38:57+5:302024-04-04T21:39:10+5:30
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकल्या प्रकरणी २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका, कचरा फेकणे, थुंकणे अशी कृत्य करून अस्वच्छता पसरविणाऱ्या ६८ लोकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ५१ हजार रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकल्या प्रकरणी २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तीन दुकानदारांनी रस्ता व फुटपाथवर कचरा टाकल्याने १२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आले. मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने दोन आस्थापनांवर कारवाई करून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज उभारून रस्ता अडवून धरल्याने ५ लोकांवर कारवाई करून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकल्याने १ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावर बांधकामाचा मलबा टाकल्या प्रकरणी देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या तिघांवर कारवाई
प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या तीन आस्थापनांवर कारवाई करून १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याने बिल्डर्सवर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.