शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:00 IST

साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे.

ठळक मुद्देपाच राज्य ओलांडून श्री सम्मेद शिखरजीपर्यंत जाणारजैन नागरिकाचा असाही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे. पर्यावरणासंबंधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान ते पाच राज्यांची भूमी ओलांडणार असून झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे या यात्रेचा समारोप होईल. अरविंद आगरकर जैन असे त्यांचे नाव असून त्यांचा उत्साह भल्याभल्यांना थक्क करणारा आहे.मूळचे अकोला येथील असलेले अरविंद आगरकर जैन हे मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत आहेत. सोबतच जनआरोग्यासंदर्भातदेखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा सायकल यात्रादेखील आयोजित केल्या. यंदा मात्र त्यांनी जास्त मोठा पल्ला गाठण्याचा निर्धार केला व अकोल्यापासून ते थेट श्री सम्मेद शिखरजी गाठण्याचा संकल्प घेतला. या यात्रेदरम्यान ते पेट्रोल बचत तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत.११ नोव्हेंबर रोजी अकोला येथील श्री शांतिनाथ चैत्यालय जैन मंदिर येथून त्यांच्या या यात्रेला सुरुवात झाली.सायकल, आवश्यक ते सामान घेऊन ते तेथून निघाले. मंगळवारी रात्री ते नागपुरात आले व बुधवारी सकाळी लक्ष्मीनगर येथील भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून पुढील प्रवासाकडे निघाले.याअगोदरदेखील केल्या आहेत सायकलयात्राअरविंद आगरकर जैन यांनी याअगोदरदेखील अनेक सायकल यात्रा केल्या आहेत. नागपूर ते रामटेक, मुक्तागिरी, शिरपूर जैन सायकल यात्रा त्यांनी पूर्ण केली. आजच्या काळात आरोग्य व पर्यावरण दोघांकडेदेखील जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मात्र लोक याच महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. याबाबतच जनजागृती करण्यासाठी मी हा पुढाकार घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

१८ दिवसात हजार किलोमीटरचा प्रवासपर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल यात्रा एकूण १८ दिवस चालणार आहे. यात ते जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करतील. नागपूरहून आता ते रामटेक मध्य प्रदेशमधील शिवनी, लखनादौन, जबलपूर, खजुराहो, कटनी, सतना, रिवा, हनुमना, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, मुगलसराय, बिहारमधील सासाराम, औरंगाबाद ,मदनपूर ,शेरघाटी, डोभी, बाराचट्टी, झारखंड राज्यातील चौपारण, बरही, बरकठा , बागोदर, डुमरी, गिरिडिह, पारसनाथ या मार्गाने श्री सम्मेद शिखरजी येते पोहोचतील.

टॅग्स :environmentवातावरण