शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:38 IST

६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. मंगळवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माच्या दिक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिन : उत्तर भारत, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथील नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. मंगळवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्माच्या दिक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजारावर लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. यावर्षी १६ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या आज पहिल्याच दिवशी पाच हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यात तरुणांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग होता. भदंत ससाई यांच्या नेतृत्वात भंते नागघोष, भंते नागसेन, भंते धम्मप्रकाश, भंते नागधम्म यांनी अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील अनुयायांचा समावेश होता. बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांकडून धर्मांतरण करण्याबाबत एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. यात त्याचे नाव, गाव पत्ता, कोणता धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे, याबाबतची माहिती आहे. दीक्षार्थीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने बौद्ध दीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याकडे स्मारक समितीचे विलास गजघाटे हे विशेष लक्ष ठेवून आहेत. या सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDhammbhumiधम्मभूमी