नितीन गडकरी : गुन्हे नियंत्रणासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीतनागपूर : उपराजधानीतील रिंग रोडच्या सिमेंटीकरणासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून ४५० कोटी रुपये देण्यात आले आहे. शिवाय रस्त्यांना चकाचक करून ‘स्मार्ट’ स्वरूप देण्यासाठी मंत्रालयातर्फे येत्या तीन वर्षांत पाच हजार कोटी रुपये देण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. महाल येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला हे विशेष.रिंग रोडच्या सिमेंटीकरणाच्या कार्याचे उद्घाटन १८ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. याची सुरुवात हिंगणा टी पॉईन्ट येथून होईल. राज्य शासन, नागपूर महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून यासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये देण्यात येतील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. शहरासाठी सिमेंट रस्ते हे फायदेशीर आहेत. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मनपा आयुक्त टी.चंद्रशेखर यांनी सिमेंटचे रस्ते बनविण्याचा सल्ला दिला होता. जर या सल्ल्याला शासनाने मान्य केले असते तर आज शहरातील रस्त्यांची इतकी वाईट अवस्था झाली नसती, असे गडकरी म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी मतदारांना जी आश्वासने दिली होती, त्यातील बहुतांश आश्वासने पूर्ण झाली आहे. यानंतरदेखील शहराच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून काम सुरूच राहील, असे गडकरी यांनी प्रतिपादन केले.‘एम्स’ला मंजुरी मिळणे हे नागपूरसाठी चांगले संकेत आहेत. यासाठी निवडण्यात आलेल्या जागेचे लवकरात लवकर हस्तांतरण व्हावे यासाठी राज्य शासनासोबत चर्चा करण्यात येईल. महिनाभरात याचे नियोजन व आराखड्याचे काम सुरू होईल. याचा आराखडा जागतिक दर्जाच्या ‘आर्किटेक्ट’कडून तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कायदा-सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारशहरातील अपराध वाढीस लागले आहेत. अशा स्थितीत पोलीस प्रशासनाने गुंडप्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करुन गुन्ह्यांचा दर कमी आणण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे. या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करील, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.मिहानमध्ये येणार ‘एचसीएल’‘मिहान’मध्ये संगणक क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘एचसीएल’ला जागा देण्यात आली होती. सुरुवातीला येथे येण्यास कंपनीने फारसा उत्साह दाखविला नव्हता. परंतु आता १५० एकर पैकी ५० एकर जागा कंपनी स्वत:जवळ ठेवणार असून येथील प्रकल्पात १ वर्षात ५ हजार तरुणांना रोजगार देण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
‘स्मार्ट’ रस्त्यांसाठी मिळणार पाच हजार कोटी
By admin | Updated: October 10, 2015 03:19 IST