शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

एलबीटीमुळे ५०० कोटींचा फटका

By admin | Updated: May 25, 2015 03:04 IST

राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी)लागू केला. आता तो आॅगस्ट महिन्यात रद्द करण्याची घोषणा केली आहे.

महापालिका : शहरातील विकास कामांवर परिणामनागपूर : राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी)लागू केला. आता तो आॅगस्ट महिन्यात रद्द करण्याची घोषणा केली आहे. परंतु या अडीच वर्षांच्या कालावधीत एलबीटीमुळे उत्पन्न घटल्याने महापालिकेला ५०० कोटींचा फटका बसला आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांना कर भरणे सोयीचे होईल. जकातीइतकेच उत्पन्न यातून प्राप्त होईल. करचोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. २०१३-१४ या वर्षात एलबीटीपासून ५४० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात २९५.७५ कोटींचा महसूल जमा झाला. २०१४-१५ या वर्षात ४२५ कोटींचा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात ३०० कोटींचाच आकडा पार करता आला. एलबीटी लागू होण्यापूर्वी जकातीच्या उत्पन्नात दरवर्षी ७० ते ७५ कोटींनी वाढ होत होती. २०१०-११ या वर्षात जकातीपासून ३६२.७८ कोटी तर २०११-१२ या वर्षात ४३७.४२ कोटींचे उत्पन्न झाले होते. जकात कायम असती तर आज ६०० कोटींचा आकडा पार केला असता. महापालिकेच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. परंतु या जबाबदारीचे निर्वहन करताना उत्पन्नाची साधने, वसुली व नवीन कराधान, अंगभूत कार्यक्षमता यात विशेष अशी वाढ होत नसल्याचे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१४-१५ चा सुधारित व २०१५-१६ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केले होते. त्यातच आॅगस्ट महिन्यात एलबीटी रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याने उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. त्यातच एलबीटीला पर्याय दिला नसल्याने पुढील वर्षात ५०० कोटींचे उद्दिष्ट गाठणे अवघड जाणार आहे.मनपाला दर महिन्याला आस्थापनेवर ६५ कोटींचा खर्च करावा लागतो. एलबीटीमुळे हा खर्च करताना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)सरकारकडून मदतीची गरजमनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी पैसे नाही. कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकीत आहेत. विकास कामे रखडली आहेत. उत्पन्नात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची गरज आहे. केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने मदत होईल, अशी पदाधिकारी व प्रशासनाला आशा आहे.