शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो चालविताना अपघात झाल्यास मिळणार ५० हजार रुपये

By सुमेध वाघमार | Updated: March 16, 2024 22:43 IST

-ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना

नागपूर : ऑटो-रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय अखेर शनिवारी सरकारने घेतला. हे मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान ५० कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑटो चालविताना अपघात होऊन दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजनेतून ५० हजार रुपये ऑटोचालकाला मिळणार आहे. 

विविध ऑटोरिक्षा संघटनेसह आॅटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती व विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने आॅटो-रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यानच्या काळात आंदोलनही केले होते. अखेर निवडणूकीच्या तोंडावर या मंडळाला मंजुरी देण्यात आली. - परिवहन मंत्री असणार अध्यक्ष

राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळाचे परिवहन मंत्री अध्यक्ष असणार आहे. सदस्य म्हणून परिवहन आयुक्त, अशासकीय सदस्यांमध्ये नोंदणीकृत आॅटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे दोन प्रतिनिधी, सदस्य सचिव म्हणून सह किंवा अपर परिवहन आयुक्त असतील. तर जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळात अध्यक्ष म्हणून त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त (वाहतूक) किंवा अपर पोलीस अधीक्षक, अशासकीय सदस्य म्हणून नोंदणीकृत आॅटो-रिक्षा मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी व सदस्य सचिव म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असणार आहेत. या मंडळाच्या कामकाजाबाबतची नियमावली लवकरच तयार होणार आहे. 

- हे आहेत फायदे:: जीवन विमा व अपंगत्व विमा योजना:: आरोग्य विषयक लाभ:: कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य :: पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना:: कामगार कौशल्य वृद्धी योजना

टॅग्स :nagpurनागपूर