शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के शेतकरी कुटुंबीयच मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:12 IST

नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षभरातील आत्महत्यांचा आकडा २४८ इतका होता. तर यातील अवघ्या ५० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात वर्षभरात २४८ शेतकरी आत्महत्यामागील पाच वर्षांत १६००हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षभरातील आत्महत्यांचा आकडा २४८ इतका होता. तर यातील अवघ्या ५० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २००१ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल २९ टक्के म्हणजेच ९७ प्रकरणे अपात्र ठरली. २७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण १ कोटी २४ लाख रुपयांची मदत देण्यात आली.१८ वर्षात चार हजारांहून अधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २००१ ते २०१८ या १८ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल ४ हजार ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील २ हजार ४५ म्हणजेच २२० म्हणजेच ५१ टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली. तर १ हजार ९३५प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. २०१४ सालापासून विभागात १ हजार ६१२ शेतकऱ्यांनी आयुष्य संपविले. यातील ६० टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता