शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के गुणाचा पात्रता निकष रद्द  : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:01 IST

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांनाच इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदी नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला.

ठळक मुद्देशिक्षक होण्याचे स्वप्न असलेल्यांना दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांनाच इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदी नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न असलेल्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०१९ रोजी संबंधित वादग्रस्त निर्णय जारी केला होता. त्याविरुद्ध सचिन सुरवाडे व इतर उमेदवारांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. वादग्रस्त निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांची याचिका मंजूर झाली. याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जुन्या नियमानुसार ते इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदासाठी पात्र आहेत. परंतु, नवीन पात्रता निकषामुळे त्यांच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले होते. तसेच, त्यांना विविध ठिकाणी झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्यासारख्या हजारो उमेदवारांचा शिक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक