शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोज ५० प्रसूती, तरीही रुग्णालयात आदर्श स्वच्छता : 'कायाकल्प'ने केला गौरव

By सुमेध वाघमार | Updated: June 23, 2025 18:32 IST

Nagpur : स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी सन्मान

नागपूर: विदर्भातील महिलांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाला या वर्षाचा प्रतिष्ठेचा 'कायाकल्प पुरस्कार २०२४-२५' प्रदान करण्यात आला. स्वच्छता, आरोग्य, संसर्ग नियंत्रण आणि पर्यावरणपूरक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप २० लाख रुपये असून, हा निधी रुग्णसेवेच्या सोयींसाठी वापरला जाईल, अशी ग्वाही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सुरजसिंग मडावी यांनी दिली.    

'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी 'कायाकल्प पुरस्कार' दिला जातो. २०१५ पासून हा पुरस्कार देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मूल्यांकनानंतर दिला जातो. या मूल्यांकनासाठी रुग्णालयातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सहाय्यक सेवा, स्वच्छता प्रोत्साहन आणि २०२१ पासून समाविष्ट करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपाययोजना यासारख्या कठोर निकषांचा आधार घेतला जातो. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाने २०२४-२५ चा हा पुरस्कार उपविजेतेपद पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. डॉ. मडावी यांनी सांगितले, हा पुरस्कार आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी, स्वच्छता आणि शाश्वतता राखण्याच्या आमच्या समर्पणाचे हे प्रतीक आहे. हा सन्मान आमच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या कठोर परिश्रम आणि एकजुटीचे प्रतिबिंब आहे.

रुग्णालयात रोज ४० ते ५० प्रसूतीप्रदीर्घ काळापासून विदर्भातील स्त्रियांना अविरत आणि दर्जेदार सेवा देणारे डागा स्मृती शासकीय स्त्री रोग रुग्णालय ही एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला आले आहे. ३६५ खाटा असलेल्या या रुग्णालयात रोज सरासरी ४० ते ५० प्रसूती होतात. त्यामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचीही २४ तास वर्दळ येथे असते. रुग्णसेवेसोबतच हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षणातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. येथे एमबीबीएस/पीजी अभ्यासक्रम, एएनएम प्रशिक्षण आणि इतर प्रगत वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातात. मिळालेला हा पुरस्कार रुग्णालयाच्या उत्कृष्ट सेवा आणि स्वच्छतेच्या बांधिलकीवर शिक्कामोर्तब करतो.

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटल