शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

मनपातील ३५ टक्के पदे रिक्त : कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 7:35 PM

सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनव्यांच्या ऐवजी सेवानिवृत्तांनाच परत संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. नवीन पदांची भरती बंद असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे. अशा स्थितीत नवीन लोकांना संधी मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. मनपामध्ये किती मंजूर पदे आहेत व त्यातील किती पदे रिक्त आहेत, किती निवृत्त कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यात आले, नवीन पदभरतीसंदर्भात मनपाची काय भूमिका आहे, इत्यादी प्रश्न विचारण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार मनपामध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मिळून ११ हजार ९६१ मंजूर पदे आहेत. यापैकी ७ हजार ९५० पदे भरली असून तब्बल ४ हजार ११८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३४.४३ इतकी आहे. वर्ग १ मधील २१४ पैकी १०३ पदे रिक्त आहेत. तर वर्ग २ ची ६१ पैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील ३ हजार ८१२ पैकी २ हजार १६ पदे रिक्त आहेत.साडेपाच वर्षांत पंधराशे सेवानिवृत्त१ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१९ या कालावधीत मनपातून १ हजार ५१९ कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाले. तर १७८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर त्यांच्या वारसदारांना अटी व शर्तींच्या अधिन राहून संधी देण्यात आली. परंतु सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर नवीन भरती झाली नाही. अनेक जागांवर तर परत सेवानिवृत्तांनाच कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्यात आले. यातील एकालाही ५० हजारांहून जास्त वेतन नाही. मनपाचा खर्च जास्त असल्याने तो ३५ टक्क्यांच्या मर्यादेत येत नाही, तोपर्यंत पुढील पदभरती करता येणार नाही, असे राज्य शासनाच्या निर्णयात नमूद होते. त्यानुसार नवीन भरती झालेली नाही.रिक्त पदांची आकडेवारीसंवर्ग                मंजूर पदे             रिक्त पदेवर्ग-१                  २१४                    १०३मानसेवी डॉक्टर ८५                      ३७वर्ग-२                 ५०                       ६१वर्ग-३                ३,८१२                   २,०१६शिक्षक              १,०६५                   ०वर्ग-४               २,७८५                  १,७११सफाई कामगार ३,९३९                   २०१

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता