नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्या नेतृत्वात १ ते ३१ जानेवारी दरम्यान ०.७७ मिलीयन टन मालवाहतूक करीत ४९.८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
दपूम रेल्वेने मालवाहतुकीतून मिळविलेले उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ९३.०७ टक्के आणि मालवाहतूक ६३.८३ टक्के अधिक आहे. विभागाने कोळसा, लोखंड, स्टील, खाद्यपदार्थ, फ्लायअॅश, मॅगनीज, पोल्ट्रीफिड या वस्तूंची वाहतूक केली. त्यानुसार विभागातील लिंगा आणि सुकळी येथे गुड्स बुकिंग करण्यात आली. त्यात लिंगा येथून ६ रॅक मका व गहू यापासून १.७० कोटी तसेच सुकळी येथून ४ रॅक वाळूपासून ५८ लाखांचे उत्पन्न मिळाले. यासोबतच १ ते ३१ जानेवारी दरम्यान १२०५ टन पार्सलच्या वाहतुकीतून ३३.३६ लाखांचे उत्पन्न मिळाले. विभागाच्या वतीने मालवाहतूक व पार्सल बुकिंग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
.........