शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

माहिती आयोगाकडे ४९ हजार ‘अपिल’ प्रलंबित; पाच वर्षांच्या तुलनेत वाढली प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 04:50 IST

जानेवारी २०१९ मध्ये राज्य माहिती आयोगाकडे आठ खंडपीठांमध्ये ३९ हजार ३१५ प्रकरणे प्रलंबित होती.

- योगेश पांडेनागपूर : राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. डिसेंबर २०१९ अखेरीस आयोगाकडे तब्बल ४९ हजारांहून अधिक द्वितीय अपिल प्रलंबित होते. वर्षभरातच प्रलंबित अपिलांची टक्केवारी २५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.जानेवारी २०१९ मध्ये राज्य माहिती आयोगाकडे आठ खंडपीठांमध्ये ३९ हजार ३१५ प्रकरणे प्रलंबित होती. वर्षभरात आयोगाकडे ४५ हजार ७२ द्वितीय अपिले आली तर या कालावधी २९ हजार ५ अपिले निकाली काढण्यात आली. उर्वरित अपिले ही दुसऱ्या खंडपीठांकडे वर्ग करण्यात आली. २०१९ च्या अखेरीस प्रलंबित अपिलांची संख्या ४९ हजार ३८५ वर पोहोचली. वर्षभरात प्रलंबित प्रकरणांमध्ये तब्बल १० हजार ७० ने वाढ झाली.राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय मिळून एकूण आठ विभाग असून प्रत्येक ठिकाणी माहिती आयुक्तांचे पद आहे.पूर्णवेळ आयुक्त नाहीतराज्य माहिती आयोगाच्या आठही कार्यालयांपैकी चार ठिकाणी पूर्णवेळ आयुक्त नसल्याचे चित्र आहे. केवळ मुख्यालय (सुमित मलिक), बृहन्मुंबई (सुनील पोरवाल), कोकण (के.एल. बिष्णोई), अमरावती (संभाजी सरकुंडे) येथे पूर्णवेळ माहिती आयुक्त आहेत. नागपूर ही राज्याची उपराजधानी असतानादेखील येथे पूर्णवेळ आयुक्त नाहीत ही आश्चर्याची बाब असल्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.पुण्यात १० हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबितराज्यात सर्वात जास्त प्रलंबित प्रकरणे पुणे कार्यालयांतर्गत आहेत. डिसेंबर २०१९ अखेरीस पुण्यामध्ये १२ हजार ६८७ प्रकरणे प्रलंबित होती. वर्षभरात पुण्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या ३ हजारांनी वाढली. अमरावती येथे ८ हजार ३८६ प्रलंबित होती. सर्वात कमी प्रलंबित अपिले नागपूर कार्यालयात २ हजार १७८ इतकी होती. याशिवाय बृहन्मुंबईत ४ हजार ४४५, कोकणात ३ हजार ७९७, औरंगाबादमध्े ५ हजार ३२१ प्रकरणे प्रलंबित होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र