शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नागपुरात ४ कोटी ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त : दोन वर्षांत ४०७ तस्कर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:19 IST

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ही माहिती उघड करण्यात आली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या एनडीपीएसची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ही माहिती उघड करण्यात आली.जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे १२७ गुन्हे दाखल केले. त्यातील ४० प्रकरणात ७३ लाखांचा ५६१ किलो गांजा जप्त करण्यात आला. १६ लाख रुपयांची कोकेनही जप्त करण्यात आली. पाच लाखांचे चरस, अडीच लाखांचे गर्द जप्त करून पोलिसांनी १७९ तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून अमली पदार्थांसह ९७ लाख ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत पोलिसांनी २ कोटी ८६ लाख ९०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १३१ आरोपींना अटक केली. १ जानेवारी ते २४ जून २०१९ या कालावधीत पोलिसांनी ७९ तस्करांना पकडले. त्यांच्याकडून ७४ लाख १३ हजार ४६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे जुलै २०१७ ते जून २०१९ या कालावधीत एनडीपीएसने ४०७ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ कोटी ५७ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या तस्करांमध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड, ओडिशा आदी राज्यातील आरोपींचाही समावेश आहे.आयुक्तांचा संकल्प!गेल्या सहा महिन्यात आबूसारख्या बड्या तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आबूशी मैत्री ठेवणाऱ्या चार पोलीसउपनिरीक्षकांसह सहा जणांना निलंबित करण्यात आले होते.पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासोबतच नागपूरला ड्रग फ्री सिटी बनविण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यानुसार एनडीपीएसकडून ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNagpur Policeनागपूर पोलीस