शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवडणूक विशेष रेल्वेगाडीत सापडली ४६४ काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:38 IST

निवडणूक विशेष रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत ४६४ काडतुसे  सापडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही काडतुसे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली.

ठळक मुद्देरेल्वे कर्मचाऱ्यांचे गेले लक्ष : आरपीएफने केले रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन      

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक विशेष रेल्वे गाडीत बेवारस स्थितीत ४६४ काडतुसे  सापडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही काडतुसे रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली.रेल्वे स्टेशनवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. याअंतर्गत निवडणूक विशेष रेल्वे गाडी चालविली जात आहे. तेलंगणा येथे निवडणूक कामासाठी भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी)चे शस्त्रांसह सज्ज असलेल्या जवानांना घेऊन निवडणूक विशेष रेल्वे (इलेक्शन स्पेशन ट्रेन) लखनौवरून विजयवाडा येथे जात होती. ही रेल्वे गाडी विजयवाडा येथे जवानांना व त्यांच्या शस्त्रांना उतरविल्यानंतर परत जाताना मंगळवारी ती नागपुरात पोहोचली. ती गुरुवारी छत्तीसगडच्या रायपूर येथे रवाना होणार होती. यासाठी बुधवारी या रेल्वे गाडीची साफसफाई नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ७ जवळील कॅरेज अ‍ॅण्ड वॅगन डिपार्टमेंट(सीअ‍ॅण्डडब्ल्यू)च्या वॉशिंग सायडिंगमध्ये केली जात होती. यादरम्यान कर्मचाऱ्यांना एका कोचमध्ये ७ नंबरच्या सीटखाली एक हिरव्या रंगाचा बॉक्स आढळून आला. त्याला जवळून पाहिले असता त्यात इन्सास रायफलचे काडतूस होते. लगेच ही माहिती आरपीएफला देण्यात आली. आरपीएफने बॉक्सची तपासणी केली असता त्यात ४६४ काडतुसे  सापडली. यानंतर हा बॉक्स रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर