शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

देशात ४४ हजार मुले सिकलसेलग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 11:20 IST

जगाच्या लोकसंख्येतील २५ टक्के सिकलसेलबाधित रुग्ण एकट्या भारतात आहेत. यात लहान मुलांची संख्या ४४ हजाराच्या घरात आहे.

ठळक मुद्देमेडिकलमधील सिकलसेल सेंटरला मिळणार तांत्रिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगाच्या लोकसंख्येतील २५ टक्के सिकलसेलबाधित रुग्ण एकट्या भारतात आहेत. यात लहान मुलांची संख्या ४४ हजाराच्या घरात आहेत. यामुळे नागपूरच्या मेडिकलमध्ये होणारे ‘द सेंटर आॅफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’ देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मेहता फाऊंडेशनच्यावतीने या सेंटरमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती नागपूरच्या दौऱ्यावर असलेले डॉ. लक्ष्मणन क्रिष्णमूर्ती यांनी दिली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अडीच एकर जागेवर ‘द सेंटर आॅफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’ होऊ घातले आहे. लवकरच निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. मेहता फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या १२० कोटी रुपयांमधून इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चतर्फे (आयसीएमआर) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गुरुवारी अमेरिकेतील डॉ. लक्ष्मणन क्रिष्णमूर्ती यांनी गुरुवारी मेडिकलला भेट दिली. डॉ. क्रिष्णमूर्ती हे मेहता फाऊंडेशनसाठी काम करतात. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हे सेंटर उभारण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेतल्याने लवकरच बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सिकलसेल हा रक्ताशी निगडित आजार आहे. यावर ‘बोनमॅरो’ प्रत्यारोपण हाच एकमेवर उपचार आहे. जेवढ्या कमी वयात, म्हणजे ८ ते १६ या वयोगटात प्रत्यारोपण झाल्यास याचे निकाल चांगले मिळतात. सध्या सिकसेलबाबत जागृकता वाढल्याने अनेक पालक प्रत्यारोपणासाठी पुढे येत आहे. भाऊ किंवा बहिणीचे २५ टक्के ‘बोन मॅरो’ जुळतात. या आजाराला घेऊन नवनवीन तंत्रज्ञानही समोर येत आहे. विशेषत: ‘हाफ मॅच’ हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. यात पालकांचे अर्धे जुळणारे ‘बोनमॅरो’ प्रत्यारोपण आहे. सध्या यावर ‘क्लिनीकल ट्रायल’सुरू आहे. या शिवाय सिकलसेलवरील उपचारासाठी ‘जीन थेरपी’वरही संशोधन सुरू आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये होणाऱ्या ‘द सेंटर आॅफ एक्सलन्स इन सिकलसेल सेंटर’मध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून सेवा देणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सिकलसेल सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ. दीप्ती जैन उपस्थित होत्या. दरम्यान डॉ. क्रिष्णमूर्ती व डॉ. जैन यांनी मेडिकलला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Healthआरोग्य