शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

राज्यात चार महिन्यांत ४३२१ वणव्यांचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST

निशांत वानखेडे नागपूर : वर्ष २०२०-२१ मध्ये देशात १ लाख १७ हजार १९० वणव्यांच्या नाेंदी करण्यात आल्या. देशात लागणाऱ्या ...

निशांत वानखेडे

नागपूर : वर्ष २०२०-२१ मध्ये देशात १ लाख १७ हजार १९० वणव्यांच्या नाेंदी करण्यात आल्या. देशात लागणाऱ्या जंगलाच्या आगीमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यात लहान-माेठ्या ११२८९ वणव्यांच्या नाेंदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांत म्हणजेच १ नाेव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत राज्यात ४३२१ वणव्यांचे अलर्ट विभागाला मिळाले हाेते आणि यातही उत्तराखंड व मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जंगलात लागणारे वणवे हे वनक्षेत्राच्या नुकसानीचे सर्वांत माेठे कारण आहे. प्राणी आणि वनस्पतींसह एकूणच जैवविविधतेवर त्याचा परिणाम हाेताे. त्यामुळे वन अग्नी नियंत्रण व व्यवस्थापन हे वनविभागासमाेर माेठे आव्हान ठरले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलात आग लागण्याचा धाेका वाढताे. फेब्रुवारी महिन्यात ती स्थिती दिसायला लागली आहे. वणव्यांची अचूक आणि रिअल टाइम माहिती मिळविण्यासाठी भारतीय वन्य सर्वेक्षण विभागाने नासाच्या टेरा आणि ॲक्वा सॅटेलाइटच्या मदतीने ‘एसएनपीपी’ आणि ‘माेडिस’ या पद्धती स्वीकारल्या आहेत. याद्वारे दिवसातून सहा वेळा वन खात्याला अलर्ट प्राप्त हाेत असताे. यातही एसएनपीपी पद्धत प्रभावी ठरत असून देशातील १० महत्त्वाच्या राज्यातील रिअल टाइल अलर्ट मिळविण्यात यश आले आहे.

याच पद्धतीच्या आधारे देशात वणव्यांचे अलर्ट मिळत आहेत. गेल्या चार महिन्यांत देशभरात ३६,७८५ वणवे लागले हाेते. फेब्रुवारी महिन्यात यामध्ये वाढ नाेंदविण्यात आली असून एकाच महिन्यात २१५६५ वन अग्नी भडकल्याच्या नाेंदी आहेत. माेडिस पद्धतीने हा आकडा ४६१६ एवढा आहे. नाेव्हेंबर २०२० मध्ये २७८०, डिसेंबरमध्ये ५०७८ व जानेवारी २०२१ मध्ये ७३६३ वणवे लागल्याची नाेंद आहे. महाराष्ट्रात केवळ गेल्या ७ दिवसांत जंगलात ७३३ आगी लागल्याची नाेंद करण्यात आली आहे. शुक्रवारी एका दिवसात राज्यात ११ ठिकाणी वनाग्नी भडकल्याचे यात नमूद आहे.

महाराष्ट्रात २६ हजार चाै. किमी क्षेत्र वणवा प्रवण

राज्यात वणव्याबाबत १८२१.५१ चाैरस किमी क्षेत्र अतिसंवेदनशील आहे. २१३५ चाै. किमी व्हेरी हाय, ९१९१ चाै. किमी. हाय फायर प्रवण, तर १२९०३ चाै. किमी वनक्षेत्र मध्यम वणवा प्रवण आहे. म्हणजे ३९ टक्के वनक्षेत्र वणवा प्रवण आहे. यातही अतिसंवेदनशील क्षेत्रात विदर्भातील वनक्षेत्राचा समावेश हाेताे.