शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या निवासी डॉक्टरांसाठी ४३ कोटींचे वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:32 IST

जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या  वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावरणपूरक म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ असेल. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पहिली इमारत ठरणार आहे.

ठळक मुद्दे२५० खोल्यांच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या  वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावरणपूरक म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ असेल. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पहिली इमारत ठरणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळून ५७२ निवासी डॉक्टर आपली सेवा देतात. या डॉक्टरांच्या निवासासाठी ‘मार्ड’ वसतिगृह व वसतिगृह क्रमांक सहा, तर २७ खोल्यांचे सुपर स्पेशालिटी हॉस्टेल परिसरात वसतिगृह आहे. निवासी डॉक्टरांच्या तुलनेत हे वसतिगृह कमी पडत होते. परिणामी, एका खोलीत दोन किंवा त्या पेक्षा जास्त डॉक्टरांना एकत्र रहावे लागायचे. यात ‘मार्ड’चे वसतिगृह जुने व जीर्ण झाले आहे. येथे गडरलाईन पासून पाण्याची समस्या आहे. ही इमारतच मोडकळीस आल्याने स्वच्छतेला वाव नव्हता. २४ तास वैद्यकीय सेवेत असणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी हे वसतिगृह आरामदायी नव्हते. येथील गैरर्सोंना घेऊन निवासी डॉक्टर नेहमीच तक्रारीचा सूर आळवत होते. विशेष म्हणजे, तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेडिकलमध्ये घेतलेल्या ‘कॉफी विथ स्टुडंटस्’मध्ये तर निवासी डॉक्टरांनी वसतिगृहातील तक्रारींचा पाऊसच पाडला होता. यात प्रामुख्याने अस्वच्छता, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, घाणीत असलेले स्वच्छता गृह, पाण्याचा तुटवडा आदी तक्रारी होत्या. आव्हाड यांनी या तक्रारींना घेऊन अधिष्ठात्यांना धारेवर धरले होते. याच दरम्यान मेडिकल व शासकीय दंत महाविद्यालयाच्या संयुक्त समितीने वसतिगृहांची पाहणी करून नूतनीकरणाचा प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठविला होता. परंतु इमारतच मोडकळीस आल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पाठविला. त्यांनी स्वत:हून यासाठी पाठपुरावा केला. अखेर शासनाने निवासी डॉक्टरांच्या समस्या लक्षात घेऊन नव्या वसतिगृहासाठी ४३ कोटींना प्रशासकीय मंजुरी दिली. यातील पहिल्या टप्प्यातील निधी मेडिकलच्या तिजोरीत जमाही झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच १३ जानेवारी रोजी वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी केले. बांधकाम पूर्ण झाल्यावर याचे विधीवत उद्घाटन केले जाईल, असेही डॉ. निसवाडे म्हणाले.तळमजल्यासह चार मजलीची इमारतनिवासी डॉक्टरांचे २५० खोल्यांचे हे वसतिगृह तळमजल्यासह चार मजलीचे असणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक खोलीला स्वच्छतागृह, आरामदायी निवासाची सोय असणार आहे. प्रत्येक खोलीमध्ये एक डॉक्टर राहील असी सोय असणार आहे. इमारतीत अद्ययावत स्वरूपातील ‘जीम’ व ‘मेस’ राहणार आहे.पर्यावरणपूरक इमारतवसतिगृहाची इमारत ही पर्यावरण पूरक असणार आहे. या ‘ग्रीन बिल्डींग’मध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. हे वसतिगृह ट्रॉमा केअर सेंटरच्या मागील दोन एकर परिसरात होणार असल्याने डॉक्टरांना वसतिगृहातून लवकर रुग्णालयात पोहचणे शक्य होईल.अत्याधुनिक सोयी सुविधांचे वसतिगृहमेडिकलमधील मुलींच्या वसतिगृहाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून लवकरच मुलांच्या वसतिगृहांचे नूतनीकरण होणार आहे. निवासी डॉक्टरांच्या नव्या वसतीगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक सोई सुविधांनी हे वसतीगृह सज्ज असेल. विशेष म्हणजे ही ‘ग्रीन बिल्डिंग’ असणार आहे. शासन निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत गंभीर असल्यामुळेच या नव्या वसतिगृहाला मंजुरी मिळाली आहे.-डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर