शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ४१ हजारावर शेतकरी होणार भूमिस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:52 IST

विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासूनचा लढा यशस्वी : शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम माफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत. एकट्या नागपुरातील ४१,७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ते आता भूमिस्वामी होतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी वर्ग दोनच्या अशा भूमिधारी जमिनी आता भूमिस्वामी म्हणून रूपांतरित करून शेतकऱ्यांना त्या जमिनीचे स्वामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या जमिनीचा धारणाधिकार बदलताना शुल्क आकारण्याची तरतूद रद्द करून यासाठी कोणतीही रक्कम न आकारता शासनानेच ही प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून हा विषय प्रलंबित होता. गेल्या १५ वर्षांपासून आम्हीही हा विषय सभागृहात लावून धरला होता. त्याला यश आले असून नागपूरसह भंडारा व गोंदियातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.नागपुरात एकूण १ लाख २२ हजार ३६७ वर्ग २ खातेदारांची संख्या आहे. यापैकी मार्च २०१८ पर्यंत वर्ग १ मध्ये ८०,६२१ प्रकरणे रूपांतरित झाली आहेत. तब्बल ४१, ७४६ प्रकरणे शिल्लक आहेत. ती सर्व आता वर्ग एक मध्ये रूपांतरित होतील.पत्रपरिषदेला आ. समीर मेघे,. आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे