शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर परिमंडळात वर्षभरात चार हजारावर वीजचोऱ्या

By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2024 13:20 IST

Nagpur : ७.२६ कोटींचा वीजचोऱ्या उघड; १४९ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ४ हजार ५० वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. वीज वापर, वाढीव वीज भार, वीज मीटरमध्ये फेरफार, वाहिनीवर आकडा टाकणे आदी प्रकारच्या या वीज चोरी आहेत. या सर्व प्रकारातून झालेल्या वीजचोरीचे मुल्य तब्बल ७ कोटी २६ लाख ४४ हजार असून या सर्व प्रकरणांत १४९ वीजचोरांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर शहर, नागपूर ग्रामिण आणि वर्धा मंडलात वीजचोरी विरोधात आक्रमक भूमिका घेत सातत्याने ठिकठिकाणी वीजचोरी विरोधात मोहीम राबविण्यात आली. यात नागपूर शहर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २६३, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १३३१ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ७८९ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल ४ कोटी ४६ लाख २१ हजार इतकी आहे. यापैकी १५९३ ग्राहकांवर तडजोडीपोटी ५२ लाख ९२ हजारांचा दंड आकारण्यात आला असून १४६ वीजचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर नागपूर नागपूर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २२, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची ५२६ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ३७१ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल १ कोटी ५४ हजार इतकी आहे. यापैकी ६०७ ग्राहकांवर तडजोडीपोटी १४ लाख ८३ हजारांचा दंड आकारण्यात आला आले. 

 नागपूर पाठोपाठ महावितरणने वर्धा जिल्ह्यात देखील वीजचोरांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवीत वर्षभरात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ४९, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १४७ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरी ५३२ प्रकरणे उघडकीस आणली. या वीजचोरीचे रक्कम तब्बल १ कोटी ७९ लाख ६८ हजार इतकी आहे. यापैकी ४९८ ग्राहकांवर तडजोडीपोटी १९ लाख ४६ हजाराचा दंड आकारण्यात आला. 

 

 - अशी आहेत वीज चोरीची प्रकरणे बेकायदेशीर वीज वापर, वाढीव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ३३४, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २०२४ तर वीज मीटर मध्ये फ़ेरफ़ार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या १६९२ प्रकरणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीnagpurनागपूरelectricityवीज