शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:13 IST

गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे विक्री घटली : शेतकऱ्यांकडून आवक वाढली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : येथील कळमन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये तीन दिवसांपासून कांदे-बटाट्यांची आवक अचानक वाढली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.कळमन्यात २० रुपये किलोवर गेलेले दर्जेदार कांदे १५ रुपये आणि बटाटे १८ रुपयांवरून १५ रुपयांपर्यंत उतरले आहेत. ठोकमध्ये भाव उतरल्याचा फायदा किरकोळमध्ये ग्राहकांना मिळत नाही. त्यांच्याकडे जास्त भावात खरेदी केलेला साठा असल्याने किरकोळ विक्रेते भाव कमी करण्यास तयार नाहीत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद असल्याने कांदे-बटाट्यांचा साठा करण्यास कुणीही तयार नाही. याशिवाय ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होणार असल्याचे अडतियांनी सांगितले. बाजारपेठा बंद राहण्याच्या अफवांमुळे लोकांनी आधीच जास्त खरेदी केली आहे. त्यामुळे ग्राहक आवश्यक तेवढीच भाजी करीत आहेत.आज पुन्हा वाढणार कांदे-बटाट्यांची आवकशुक्रवारी कळमना कांदे-बटाटे बाजारपेठ बंद आहे. आधीच माल पडून आहे. शनिवारी आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. कांदे आणि बटाटे चार ते पाच दिवस टिकणारे आहेत. आवकीच्या प्रमाणात मागणी कमी असल्याने माल विक्रीविना पडून राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापारी मालाची ऑर्डर कमी करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वीच शिल्लक असलेला माल विकण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. कळमन्यात अन्य राज्यात आणि जिल्ह्यामध्येही पुरवठा कमी झाला आहे.देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रासह अनेक राज्ये सरकारांनी लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. बाजारपेठा बंद राहण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा वगळता रेस्टॉरंट, मॉल आणि अन्ये दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात कांदे-बटाटे विक्रीसाठी कळमना बाजारात पाठविले. पण मागणीपेक्षा जास्त माल बाजारात आल्याने कांदे-बटाट्यांचा साठा शिल्लक आहे.फळांची आवक वाढलीसध्या कळमन्यात संत्री, सफरचंद आणि अननसाची आवक वाढली आहे. ग्राहक नसल्याने फळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीविना शिल्लक आहेत. दिवसेंदिवस आवक वाढत आहे. विक्री कशी करायची, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :onionकांदाnagpurनागपूर